Team WebNewsWala
Other पर्यावरण शहर समाजकारण

येऊर जंगलात भरकटले युवक, शोध घेण्यास यश

येऊरमध्ये ट्रेकिंगला जातो म्हणून तीन युवक आपआपल्या घरातून बाहेर पडतात. सायंकाळी हे युवक येऊर जंगलात भरकटले. माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ

येऊरमध्ये ट्रेकिंगला जातो म्हणून तीन युवक आपआपल्या घरातून बाहेर पडतात. सायंकाळी हे युवक येऊर जंगलात भरकटले. हे युवक येऊरच्या घनदाट जंगलात वाट चुकून भरकटल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडते. सोमवारी संध्याकाळी वनविभागाचे अधिकारी, पोलिस आणि येऊरमधील स्थानिक ग्रामस्थ यांची शोधमोहीम सुरू होती…

तब्बल सात ते आठ तासांच्या शोधानंतर मंगळवारी पहाटे तिन्ही युवकांचा शोध घेण्यास यश मिळाले असून ही मुले सुखरूप सापडल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

तिन्ही युवक वसंतविहार भागातील 
मोबाइल लोकेशनद्वारे युवकांचा शोध घेण्याचा प्रयत्न
सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत रोकडे आणि त्यांच्या टीमने याबाबतची माहिती तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. तसेच मोबाइल लोकेशनद्वारे युवकांचा शोध घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न सुरू केला. दुसरीकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही मुलांचा शोध सुरू केला.

शोधासाठी जंगलात वनविभागाची सहा पथके
वनविभागाची एकूण सहा पथके बनवण्यात आली होती. तसेच येऊरमधील स्थानिक ग्रामस्थ हेही शोधकार्यात मदत करत होते. या सर्वांनी रात्रभर येऊरमधील बराचसा परिसर पिंजून काढला. मात्र युवकांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत शोधकार्य सुरू होते. युवक न सापडल्याने जंगलातून पथके परत आली. नंतर पुन्हा एक पथक युवकांच्या शोधासाठी जंगलात पाठवले. सात ते आठ तासांच्या शोधानंतर अखेर या युवकांचा शोध लागला. आणि पहाटे चार वाजता युवकांना जंगलातून सुखरूपपणे बाहेर आणण्यात आले.
जंगलातील काळोखेचे पाणी याठिकाणी हे युवक बसले होते, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. हे युवक घाबरलेले होते, असेही अधिकारी सांगतात. वनअधिकारी राजन खरात, विकास कदम यांच्यासह इतरही कर्मचाऱ्यांनी मुलांचा शोध घेण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

कोरोनिल’ विक्रीतून ‘पतंजली’ मालामाल

Team webnewswala

रेल्वेत चहासाठी पुन्हा कुल्हड

Team webnewswala

विनापरवानगी वृक्षतोड / वृक्षछाटणी करणा-यांवर दखलपात्र गुन्हे

Team webnewswala

Leave a Reply