Other तंत्रज्ञान

WhatsApp वरून तुमच्या वागणुकीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचं समोर

आता WhatsApp वरून तुमच्या वागणुकीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचं समोर आले आहे. सुरक्षेसंदर्भात पुन्हा एक नवीन मुद्दासमोर आला असून

WhatsApp आणि Facebook दोन्हीही फेसबुक कंपनीच्या मालकीचे आहेत. सुरक्षेसंदर्भात पुन्हा एक नवीन मुद्दासमोर आला असून आता WhatsApp वरून तुमच्या वागणुकीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचं समोर आले आहे. यामुळे भविष्यात तुमचं WhatsApp देखील सुरक्षित राहणार नाही की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जगभर Facebook आणि WhatsApp  या दोन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ऑनलाइन चॅटिंग करण्यासाठी ही दोन माध्यमं प्रचंड लोकप्रिय आहेत. जगभरात करोडो युजर्स असलेल्या या दोन्ही माध्यमांच्या सुरक्षेसंदर्भात अनेकदा चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

काही अ‍ॅप्सचा वापर करूनWhatsApp वरून तुमच्या वागणुकीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचं Business Insiderच्या एका अहवालात सांगण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारे WhatsApp ची सुरक्षा म्हणजे Encryption तोडावं लागत नाही. अगदी सहज या अपच्या मदतीने तुमच्या वागणुकीवर लक्ष ठेवता येतं.

Stalkerware सारखे अ‍ॅप असं ठेवत आहे लक्ष

युजरची माहिती चोरणारी अ‍ॅप युजरवर लक्ष ठेऊन असतात. ज्यावेळी युजर ऑनलाईन येतो, तेंव्हापासून पासून त्याच्यावर लक्ष ठेवले जाते. ती व्यक्ती कुणाशी किती वेळ बोलते, कधी अ‍ॅप बंद करते, ऑनलाइन येण्याच्या त्या व्यक्तीच्या सवयी काय आहेत ही सगळी माहिती या अ‍ॅप्सना मिळू शकते. अनेक दिवसांचा आणि आठवड्यांचा डेटा एकत्रित करून या युजरच्या ऑनलाइन सवयींचं आणि वागणुकीचं प्रोफाइल तयार केलं जातं.  Electronic Frontier Foundarion (EFF) मधील वरिष्ठ संशोधकांनी असं म्हटलंय की गूगल प्ले स्टोअर व अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर दोन्हीवर अशा पद्धतीची बरीच अप उपलब्ध आहेत.

Stalkerware सारखी अ‍ॅप युजरचा डेटा विकतात

ही Stalkerware सारखी अ‍ॅप ही माहिती त्यांच्या ग्राहकांना विकतात. सर्व युजरचा डेटा एकत्रित करून ते सर्व डेटा एकमेकांशी मॅच करून पाहतात. त्यानंतर त्यांच्या अ‍ॅपमध्ये ज्या व्यक्तीचा डेटा पहायचा आहे त्याचा मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर त्या अ‍ॅपच्या मदतीने आपोआप त्याच्या ऑनलाइन हालचाली ट्रॅक होऊ शकतात. ही माहिती पुरवणाऱ्या अ‍ॅपचे ग्राहक या माहितीचा वापर संभाव्य ग्राहकाच्या ऑनलाइन सवयींवरून त्याला काय आणि कधी विकायचं हे ठरवण्यासाठी करतात. काही पालक आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी या अ‍ॅपचा वापर करत असल्याचं देखील समोर आलं होतं.

WhatsAppने प्ले स्टोअरला ते apps बॅन करण्याची केली विनंती

दरम्यान जरी डेटा चोरणारी Stalkerware सारखी अ‍ॅप तुमची माहिती चोरत असले तरीही WhatsApp वरील Encryption मुळे प्रत्यक्ष तुम्ही काय बोलत आहोत ते संवाद कुणाला बघता येत नाहीत. ते सुरक्षित आहेत, असं ‘बिझनेस इनसायडर’ने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. WhatsAppच्या सुरक्षित उपाययोजनांनंतर देखील अशा पद्धतीने डेटा चोरी होत असल्यानं युजरची चिंता वाढली आहे. अशा काही अ‍ॅप्सची माहिती मिळाल्यानंतर WhatsAppने प्ले स्टोअरला ते apps बॅन करण्याची विनंती केली होती. त्याचबरोबर WhatsApp आपल्या युजरला विविध सुरक्षेचे पर्याय देखील देत आहे.  असे असले तरीही युजर्लनी आपली गोपनीय माहिती या माध्यमातून शेअर करणे टाळावे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

इराणी चलन गाळात; एका डाॅलरसाठी पाउणे तीन लाख रियाल

Team webnewswala

फेसबुक मॅसेंजरवर स्क्रीन शेअरिंग सुविधा

Team webnewswala

यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे निरूत्साही

Team webnewswala

Leave a Reply