Team WebNewsWala
शहर समाजकारण

योगेश चांदोरकर व उमेश कणेरकर यांची अँब्युलन्सला टायर देत कोरोनाग्रस्तांना अनोखी मदत

योगेश चांदोसकर व उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर यांनी स्वखर्चाने या १०८ रुग्णवाहिकेला नवीन टायर उपलब्ध करून कोरोनाग्रस्तांना अनोखी मदत दिली.

योगेश चांदोरकर व उमेश कणेरकर यांची अँब्युलन्सला टायर देत कोरोनाग्रस्तांना अनोखी मदत

Webnewswala Online Team | देवगड – कोरोना महामारीच्या साथीत रुग्णांना उपचारासाठी पुढे हलविण्यात ॲम्बुलन्स (रुग्णवाहिका) हा महत्त्वाचा घटक आहे. देवगड ग्रामीण रुग्णालयाची 108 एम्बुलेंस टायर निकामी झाल्यामुळे बंद पडण्याच्या अवस्थेत होती. देवगडचे माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर व उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर यांनी सामाजिक भान राखत आपल्या स्वखर्चाने या १०८ रुग्णवाहिकेला नवीन टायर उपलब्ध करून कोरोनाग्रस्तांना अनोखी मदत दिली आहे.

 

24 हजार रुपये खर्च करून अँब्युलन्सला लागणारे चारही टायर दिले

हे टायर आज त्यांनी सुपूर्त केले आहेत पेशंटना ग्रामीण भागातून आणायला व जिल्हास्तरावर हलवायला 108 एम्बुलेंस सध्या महत्त्वाची भूमिका बजावत आहे. देवगड हे भौगोलिक दृष्ट्या जिल्ह्याच्या एका टोकाला असलेले गाव असल्याने ॲम्बुलन्स ची गरज लागणार हे निश्चित 108 एम्बुलेंस चे टायर खराब झाले. यामुळेही अँब्युलन्स वापरण्यासाठी अनेक समस्या निर्माण होतात हे लक्षात आल्यावर योगेश चांदोरकर व उमेश कणेरकर यांनी सुमारे 24 हजार रुपये खर्च करून त्या गाडीला लागणारे चारही टायर दिले आहेत.

रुग्णांना उपचारासाठी पुढे हलविण्यात रुग्णवाहिका महत्त्वाचा घटक

यावेळी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, सभापती रवी पाळेकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, शिक्षण व आरोग्य सभापती संजय तारकर, नगरसेवक निरज घाडी, बांधकाम सभापती बापू जुवाटकर, वैदयकीय अधिक्षक डॉक्टर विटकर, भाजप जिल्हाउपाध्यक्ष बाळ खडपे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, ज्ञानेश्वर खवळे उपस्थित होते.

Title – योगेश चांदोरकर व उमेश कणेरकर यांची अँब्युलन्सला टायर देत कोरोनाग्रस्तांना अनोखी मदत ( Yogesh Chandorkar and Umesh Kanerkar donate tires to the ambulance )

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

BioMilk Startup प्रयोगशाळेत बनवले आईचे दूध

Web News Wala

EMI Moratorium वर तारीख पे तारिख

Team webnewswala

पुन:प्रदर्शित मराठी चित्रपट प्रेक्षकांची पाठ

Team webnewswala

Leave a Reply