Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय इतर

World record १,२,३… नव्हे तर १० मुलांना दिला जन्म

world record दक्षिण आफ्रिकेत(South Africa) प्रिटोरिया(Pretoria) राहणाऱ्या गोसियामे थमारा सिथोले महिलेने तब्बल १० मुलांना जन्म देऊन नवा विश्वरेकॉर्ड बनवला आहे.

World record १,२,३… नव्हे तर १० मुलांना दिला जन्म

Webnewswala Online Team – दक्षिण आफ्रिकेत(South Africa) एका महिलेने तब्बल १० मुलांना जन्म देऊन नवा विश्वरेकॉर्ड बनवला आहे. प्रिटोरिया(Pretoria) राहणाऱ्या गोसियामे थमारा सिथोले(Gosiame Thamara Sithole) ने दावा केलाय की, तिने ७ मुलांना आणि ३ मुलींना जन्म दिला आहे. ३७ वर्षीय गोसियामे थमारा सिथोले या महिलेने ७ जून रोजी दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरियाच्या हॉस्पिटलमध्ये १० मुलांना जन्म दिला आहे.

७ मुलं आणि ३ मुलींना जन्म

याआधीच जुळ्या मुलांची आई असलेल्या सिथोलेने ७ मुलं आणि ३ मुलींना जन्म दिला आहे. या घटनेमुळे स्वत: ती महिला अचंबित झाली आहे. कारण सुरुवातीला डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर तिच्या पोटात ६ मुलं असल्याचं सांगितलं होतं. मिररच्या रिपोर्टनुसार, गोसियामे थमारा सिथोलेने दावा केलाय की, तिने नैसर्गिक पद्धतीने गर्भवती झाली आहे. परंतु गर्भधारणा तिच्यासाठी सोप्पी नव्हती कारण या काळात तिच्या पायात प्रचंड वेदना होत होत्या. हार्टबर्नसारख्या समस्येचाही सामना करावा लागला.

सर्वाधिक मुलांना जन्म देण्याचा रेकॉर्ड मोरक्को च्या हलीमा सिस्से च्या नावावर 

गोसियाने थमारा सिथोलच्या या दाव्याची पुष्टी अद्याप डॉक्टर अथवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसद्वारे केली नाही. जर हा दावा खरा ठरला तर सर्वात जास्त मुलांना जन्म देण्याचा हा जागतिक रेकॉर्ड बनेल. एका प्रेग्नेंसीमध्ये सर्वाधिक मुलांना जन्म देण्याचा रेकॉर्ड सध्या हलीमा सिस्से(Halima Cisse) नावाच्या महिलेवर आहे. या महिलेने मे महिन्यात मोरक्कोच्या एका हॉस्पिटलमध्ये एकाचवेळी ९ मुलांना जन्म दिला होता. हायरिस्क प्रेग्नेंसी पाहता गोसियामे थमारा सिथोलेला चिंता होती की, कदाचित त्यांची मुले जिवंत राहू शकणार नाहीत. परंतु सर्व मुलं जिवंत असून पुढील काही महिने त्यांना इन्क्यूबेटरोमध्ये ठेवलं जाणार आहे. मुलांच्या जन्मानंतर सिथोलेचे पती तेबोहो त्सोतेत्सीने सांगितले की, तो खूप आनंदी आणि भावूक आहे.

एकावेळी नऊ बाळांना जन्म देण्याची ही घटना

पश्चिम आफ्रिकेच्या (West Africa) मालीमध्ये (Mali) एका महिलेने चक्क एकत्र नऊ बाळांना जन्म (Women gives birth to 9 Babies) दिला होता. या महिलेच्या डिलीव्हरीनंतर डॉक्टरही हैराण झाले. कारण प्रेग्नन्सीवेळी महिलेच्या गर्भात केवळ सात बाळच डिटेक्ट झाले होते. बाळांमध्ये पाच मुली आणि चार मुलं आहेत. प्रेग्नेन्सी दरम्यान मोरक्को आणि मालीमध्ये सिसेचा अल्ट्रासाउंडही करण्यात आला होता. अल्ट्रासाउंड बघितल्यावर डॉक्टरांना केवळ सात बाळच दिसले होते. पण डॉक्टर अल्ट्रासाउंडमध्ये दोन बाळ ट्रॅक करू शकले नाहीत. सर्वच बाळांचा जन्म सिजेरिअन सेक्शनने झाला.

Web Title – World record १,२,३… नव्हे तर १० मुलांना दिला जन्म ( World record 1,2,3 … not 10 children were born )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

भारताने केला एअर बबल करार आता बिनधास्त करा विमान प्रवास

Team webnewswala

करोना लसीचा पहिला डोस मिळणार भारतीय वंशाच्या व्यक्तीला

Team webnewswala

IPL 2021 Update आयपीएलचा दसऱ्याचा मुहूर्तही चुकणार

Web News Wala

1 comment

World record १,२,३... न... June 9, 2021 at 8:09 pm

[…] world record दक्षिण आफ्रिकेत(South Africa) प्रिटोरिया(Pretoria) राहणाऱ्या गोसियामे थमारा सिथोले महिलेने तब्बल १० मुलांना जन्म देऊन नवा रेकॉर्ड  […]

Reply

Leave a Reply