Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय आरोग्य

जगात सर्वप्रथम कोरोना लस घेतलेल्या विल्यम शेक्सपिअर यांचे निधन

जगात सर्वात अगोदर कोरोनाची लस घेतलेल्या विल्यम शेक्सपिअर यांचा मृत्यू

जगात सर्वप्रथम कोरोना लस घेतलेल्या विल्यम शेक्सपिअर यांचे निधन

Webnewswala Online Team – जगात सर्वात अगोदर कोरोनाची लस घेतलेल्या विल्यम शेक्सपिअर (वय 81) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना 8 डिसेंबर रोजी फायझर-बायोएनटेकच्या लसीचा पहिला डोस दिला होता. इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी हॉस्पीटल कॉनव्हेंट्रीमध्ये मार्गारेट केनान या 90 वर्षीय आजींबरोबरच शेक्सपिअर यांनाही लसीचा डोस दिला होता. ज्या युनिव्हर्सिटी हॉस्पीटलमध्ये शेक्सपिअरने करोनाची लस घेतली त्याच रुग्णालयामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

शेक्सपिअर हे रोल्स रॉयस कंपनीचे माजी कर्मचारी होते. त्यांच्या मृत्यूसंदर्भातील बातमी डेली मेल या वृत्तपत्राने दिली आहे. शेक्सपिअर यांचा मृत्यू करोनामुळे झाला नसून आधीपासून असणाऱ्या आजारामुळे झाल्याचे सांगण्यात आले आहे. जगातील सर्वोत्तम नाटककार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विल्यम शेक्सपिअरच्या नावाशी साधर्म्य असणारे नाव असल्याने या 81 वर्षीय आजोबांबद्दल इंग्लंडमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. या आजोबांना लस दिल्याच्या बातमीची दखल आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रानेही घेतली होती. जेनी इनिस या शेक्सपिअरच्या मित्राने फेसबुकवर अनेक गोष्टींसाठी तो कायम आठवणीत राहील.

त्यामध्ये लस घेण्याचाही समावेश आहे. त्याला श्रद्धांजली वाहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वत:चे लसीकरण करुन घेणे, असा मजकूर पोस्ट केला आहे. डिसेंबरमध्ये लस घेतल्यानंतर शेक्सपिअर यांनी आपली प्रतिक्रिया देताना, त्यांनी समाधान व्यक्त करतानाच रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळाल्याचे म्हटले होते. गेल्या अनेक दशकांमध्ये केलेल्या कामासाठी ते कायम लक्षात राहतील, असे शेक्सपिअर सदस्य असणाऱ्या वेस्ट मिडलॅण्ड्स लेबर ग्रुपने ट्विटरवरुन म्हटले आहे.

Web Title – जगात सर्वप्रथम कोरोना लस घेतलेल्या विल्यम शेक्सपिअर यांचे निधन ( William Shakespeare, the world’s first corona vaccine, dies )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

दातांच्या आरोग्यासाठी या गोष्टी करणे टाळा

Team webnewswala

IPL 2021 सप्टेंबरमध्ये होणार दुबईत

Web News Wala

Corbevax सर्वात स्वस्त लस, 30 कोटी डोसची प्री-बुकिंग

Web News Wala

Leave a Reply