Team WebNewsWala
राजकारण राष्ट्रीय

लसीच्या तीन वेगवेगळ्या किंमती का ? प्रियांका गांधी यांचा सवाल

करोना लस देशातील सर्व नागरिकांनाच दिली जाणार आहे तर लसींच्या किंमतीत भेदभाव का ? एकाच देशात लसीच्या तीन वेगवेगळ्या किंमती का ? असा थेट प्रश्न प्रियंका गांधी यांनी सरकारला विचारला आहे.

लसीच्या वेगवेगळ्या किंमती का ? प्रियांका गांधी यांचा सवाल

Webnewswala Online Team – देशात करोनाला रोखण्यासाठी लसीकरण सुरू आहे. मात्र अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच दरम्यान काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी करोना लसीवरून मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. करोना लस देशातील सर्व नागरिकांनाच दिली जाणार आहे तर लसींच्या किंमतीत भेदभाव का ? एकाच देशात लसीच्या तीन वेगवेगळ्या किंमती का ? असा थेट प्रश्न प्रियंका गांधी यांनी सरकारला विचारला आहे.

तीन टक्के लोकसंख्येचेही लसीकरण पूर्ण नाही

‘केंद्र सरकार भारतातील तीन टक्के लोकसंख्येचेही लसीकरण पूर्ण करू शकलेले नाही. करोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदी सरकारने लस वितरण व्यवस्था आणखीन मजबूतीने आपल्या हाती घेण्याची गरज होती, मात्र या वेळेस सरकारने आपल्या जबाबदारीतून हात झटकले आणि लस वितरणाची जबाबदारी राज्यांवर ढकलली’ असा घणाघात प्रियंका गांधी यांनी केला आहे.

एप्रिलपर्यंत जवळपास 34 कोटी लसींचीच मागणी
तसेच ‘केंद्र सरकारने एप्रिलपर्यंत जवळपास 34 कोटी लसींचीच मागणी केली होती. लसीकरणाचा सध्याचा दर लक्षात घेता प्रत्येक दिवशी जवळपास 19 लाख नागरिकांचे लसीकरण पार पडत आहे.’ ‘सरकारकडून डिसेंबर 2021 पर्यंत देशातील सर्व नागरिकांना लस उपलब्ध करून देण्याचा दावा केला आहे. परंतु, यासाठी प्रत्येक दिवशी 70-80 लाख लसीचे डोस देण्याची कोणतीही योजना सरकारने देशासमोर ठेवलेली नाही.

करोना लस देशातील सर्व नागरिकांनाच दिली जाणार असेल तर लसींच्या किंमतीत भेदभाव का? एकाच देशात लसीच्या तीन वेगवेगळ्या किंमती का?’ असा शब्दांत प्रियंका यांनी निशाणा साधला आहे. तसेच ‘लसीच्या वितरणासंबंधी केंद्र सरकार दिशाहीन आहे. केंद्र सरकारच्या दिशाहीन नीतीमुळे अनेक राज्यांना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढावं लागलं.’

‘आज मॉडर्ना, फायजर यांसारख्या लस कंपन्यांनी राज्यांशी थेट व्यवहार करण्यास नकार देत केंद्राशी चर्चेचा प्रस्ताव मांडला आहे. ग्लोबल टेंडर काढायला लावून राज्यांना एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनण्याची वेळच का आली?’ असे अनेक प्रश्न प्रियंका यांनी केले आहे.

Web Title – लसीच्या तीन वेगवेगळ्या किंमती का ? प्रियांका गांधी यांचा सवाल ( Why three different prices for vaccines? Priyanka Gandhi’s question )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

‘कोरोनिल’ वरुन बाबा रामदेव अडचणीत कोर्टानं बजावले समन्स

Web News Wala

गॅंगस्टर विकास दुबेच्या आयुष्यावर येणार वेब सिरीज

Team webnewswala

Ola भारतात लाँच करणार Ola Electric Scooters

Team webnewswala

Leave a Reply