Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय आरोग्य

आहारात मिठाच्या प्रमाणाबद्दल WHO च्या नव्या गाईडलाईन

रोजच्या आहारात मिठाच्या प्रमाणाबद्दल WHO च्या नव्या गाईडलाईन अन्न बनण्यासाठी आपण मिठाचा वापर करतो. परंतु, जादा मीठ खाल्ल्याने दुष्परिणाम होत आहे

रोजच्या आहारात मिठाच्या प्रमाणाबद्दल WHO च्या नव्या गाईडलाईन 

मुंबई – webnewswala Online Team 

चविष्ट अन्न बनण्यासाठी आपण मिठाचा वापर करतो. परंतु, जादा मीठ खाल्ल्याने दुष्परिणाम होत आहे असे दिसून आले आहे. डब्ल्यूएचओच्या अभ्यासात जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने दरवर्षी ३ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो, असे समोर आले आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी दिवसातून फक्त ५ ग्रॅम मीठ खाण्याचा सल्ला संस्थेने लोकांना दिला आहे. यासह ६० पेक्षा जास्त खाद्य श्रेणींमध्ये सोडियमच्या पातळीसाठी नवीन मानकं तयार केली गेली आहेत. या WHO च्या नव्या गाईडलाईन मुळे २०२५ पर्यंत मिठाचा वापर ३० टक्क्यांनी कमी होईल असे मानले जात आहे. दरम्यान, आवश्यकतेपेक्षा आपण जास्त मीठ खात आहे असे डब्ल्यूएचओचे मत आहे.

सोडियम आणि पोटॅशियमचे संतुलन शरीरात आवश्यक

दुसरीकडे तज्ञांनीही आपले मत व्यक्त केले असून सोडियम आणि पोटॅशियमचे संतुलन आपल्या शरीरात असणे आवश्यक असते. कमी पोटॅशियमसह जास्त सोडियमचे सेवन केल्याने आरोग्यास हानी पोहचू शकते. अन्नामध्ये मीठ जास्त असल्यास रक्तदाब, हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो यामुळे हाडे देखील कमजोर होतात.

लोक दररोज खातात ९ ते १२ ग्रॅम मीठ

मिठाचं सेवन केल्यामुळे मज्जातंतूचे आरोग्य सुधारते तसेच निरोगी प्लाझ्मा तयार करण्यासाठीही मदत होते असे मानले जाते. हे प्रोसेस्ड फूड, पाकिटबंद पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ आणि मांस यासारख्या खाद्यपदार्थांमध्ये अधिक आढळते. तथापि मसाले आणि चटपटीत पदार्थांमध्येही याचे भरपूर प्रमाण आढळते. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार, बहुतांश लोक दररोज सरासरी ९ ते १२ ग्रॅम मिठाचे सेवन करतात. त्यामुळे मिठाचा वापर योग्य पद्धतीने केल्यास जागतिक पातळीवर २.५ मिलियन मृत्यू रोखता येऊ शकतात. असा अंदाज संस्थेने लावला आहे.

नवीन बेंचमार्कमागील खरे कारण

संस्थेने नवीन मार्गदर्शक सूचना अमलात आणल्या आहेत. त्यानुसार ६० हून अधिक खाद्य श्रेणींमध्ये सोडियमच्या पातळीसाठी ठरवलेली मानके देशांना मिठाचे सेवन कमी करण्यास आणि लोकांचे जीवन वाचवण्यास मदत करतील. संस्थेच्या कल्पनेनुसार ज्या ठिकाणी प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात त्या ठिकाणी सोडियमचे सेवन कमी होईल. अमेरिकन ग्राहक अ‍ॅडव्होकेसी ग्रुप आणि जनतेच्या हितासाठी विज्ञान केंद्राद्वारे जाहीर केले आहे.

मिठाचे फायदे व दुष्परिणाम

रोजच्या आहाराचा एक आवश्यक भाग म्हणजे मीठ. त्याशिवाय प्रत्येक जेवण अपूर्ण आहे. त्याच्या सेवनाने शरीरास कार्य करण्यास मदत करते. हे केवळ शरीराला हायड्रेटेडच ठेवत नाही तर थायरॉईडला योग्यप्रकारे कार्य करण्यास देखील मदत करते. ज्यांना लो बीपीची समस्या त्यांना मिठाचे सेवन आवश्यक आहे. हे सिस्टिक फायब्रोसिसची लक्षणे सुधारते. पण त्याचा जास्त प्रमाणात वापर झाला तर आरोग्यास मोठे नुकसान होऊ शकते. यामुळे हृदयरोग, स्ट्रोक, उच्च बीपी आणि किडनीचे आजार होण्याचा धोका वाढू शकतो.

मिठाविषयी गैरसमज

घाम आल्यानंतर मीठ जास्त प्रमाणात खावे असा काही लोकांचा समज आहे. परंतु हे चुकीचे आहे. कारण घाम आल्यानंतर फक्त हायड्रेशनची आवश्यकता असते. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने कोणत्याही वयातील व्यक्तीचा रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे संस्थेने मिठाच्या अभावाबद्दल काही समज व गैरसमजांविषयी देखील स्पष्टीकरण दिले आहे.

फूड कॅटेगरीज व सोडियमची मात्रा 

डब्ल्यूएचओने सोडियमचा बेंचमार्क ५ मे रोजीच प्रकाशित केला आहे. त्यामुळे वेगवेगळे पाकिटबंद व प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ म्हणजे की, पाकिटबंद ब्रेड, चटपटीत किंवा नमकीन स्नॅक्स, मांस खाद्यपदार्थ आणि पनीर यासारख्या सामग्रीमध्ये मार्गदर्शक सूचनांनुसार, १०० ग्रॅम बटाटा चिप्समध्ये जास्तीत जास्त १०० ग्रॅमच सोडियम असले पाहिजे. तर पाई आणि पेस्ट्रीमध्ये १२० ग्रॅम पर्यंत आणि प्रक्रिया केलेल्या मांसमध्ये ३० मिलीग्रॅम पर्यंतच सोडियम असणे आवश्यक असल्याचे म्हंटले आहे.

Title – रोजच्या आहारात मिठाच्या प्रमाणाबद्दल WHO च्या नव्या गाईडलाईन ( WHO’s new guideline on the amount of salt in the daily diet )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

अमेरिकेत ७.८ रिश्टर स्केल तिव्रतेचा भूकंप

Team webnewswala

किती दिवसानंतर ToothBrush बदलावा जाणून घ्या

Web News Wala

Forbes च्या सामर्थ्यवान महिलांच्या यादीत निर्मला सीतारामन

Team webnewswala

Leave a Reply