Team WebNewsWala
Other शहर

राजगृह वर दगडफेक करणारा माथेफ़िरू पोलिसांच्या ताब्यात

राजगृहा वर दगडफेक करणारा माथेफ़िरू पोलिसंच्या ताब्यात

संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील ‘राजगृह’ या बंगल्यावर दगडफेक तसेच आवारातील झाडांची नासधूस करुन पसार झालेला माथेफिरु तरुण अखेर सापडला. माटूंगा पोलिसांनी त्याला शोधून काढत कल्याणमध्ये पकडला. आरोपीने गुन्ह्याची कबूली दिली.

राजगृह बंगल्यावर झाली होती दगडफेक

विशाल मोरे ऊर्फ विठ्ठल काण्या (20) असे आरोपी माथेफिरुचे नाव आहे. सात जुलैच्या संध्याकाळी तमाम देशवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या राजगृह बंगल्यावर दगडफेक झाली होती. तसेच बंगल्याच्या आवारातील झाडांची नासधुस करण्यात आली होती. हा प्रकार समोर येताच जनक्षोभ उसलला होता.

CCTC फुटेजच्या आधारे अटक

माटुंगा पोलिसांनी CCTC फुटेजच्या आधारे उमेश जाधव (36) या एका आरोपीला पकडले होते. मात्र गुन्ह्यातला मुख्य आरोपी पसार झाला होता. वरिष्ठ निरीक्षक विजयसिंग घाटगे, पोलिस निरीक्षक विनय पाटणकर व पथक आरोपीचा कसून शोध घेत होते. आरोपीची माहिती देणार्यास बक्षिसही जाहिर करण्यात आले होते.

आरोपी ठाण्यापर्यंत चालत गेल्याचे सीसी टिव्हीमुळे स्पष्ट होताच पोलिसांनी त्याच मार्गावर शोध मोहिम तीव्र केली होती. अखेर विशाल मोरे याला आज पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून उचलले. मजूरी करणारा विशाल तेथेच फुटपाथवर राहतो. गुन्ह्याची कबूली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.  त्याने हा गुन्हा का केला याचा माटूंगा  पोलिस शोध घेत आहेत.

आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | इंस्टाग्राम | youtube | ट्विटर | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मुंबईतील शाळा, महाविद्यालये १५ जानेवारीपर्यंत बंदच

Web News Wala

देवनारमध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मिती आणखी एक प्रकल्प

Web News Wala

अहमदाबाद पाठोपाठ मुंबईत सापडला Monolith मोनोलिथ

Web News Wala

Leave a Reply