Team WebNewsWala
शहर समाजकारण

भिवंडी लेखणी बोलते तेव्हा पुस्तक प्रकाशन आणि काव्य संमेलन संपन्न

भिवंडी येथील निसर्गाच्या सानिध्यात युवा कवी निलेश हेंबाडे यांच्या लेखणी बोलते तेव्हा पहिल्याच काव्य पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत

भिवंडी लेखणी बोलते तेव्हा पुस्तक प्रकाशन आणि काव्य संमेलन संपन्न

भिवंडी – भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथील निसर्गाच्या सानिध्यात युवा कवी निलेश हेंबाडे यांच्या पहिल्याच काव्य पुस्तकाचे प्रकाशन आणि ठाणे,पालघर जिल्यातील कवी कवियत्री यांचे काव्य संमेलन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उल्हासात पार पडले.विशेष म्हणजे कार्यक्रमाचे आयोजन निसर्गरम्य परिसरात केल्याने निसर्ग कविता रसिकांना मंत्रमुग्ध करून गेल्या.

कवी निलेश हेंबाडे यांचा पहिलाच काव्यसंग्रह

युवा कवी निलेश हेंबाडे यांचा “लेखणी बोलते तेव्हा” हा प्रामुख्याने निसर्ग, पर्यावरण आणि बळीराजा यांवर आधारलेल्या पहिलाच काव्यसंग्रह्याच्या पुस्तक प्रकाशनावेळी उपस्थित जेष्ठ पत्रकार अशोक पाटील यांनी सांगितले की हा पहिलाच काव्यसंग्रह असला तरी यातील कविता या निसर्ग, शेतकरी आणि समाजातील वस्तुस्थितीवर आधारित आहेत आणि त्यांच्याकडून असेच समाजाच्या विविध समस्यांवर आणि बाबींवर काव्य निर्माण होत जावो असे मनोगत व्यक्त केले.

लेखणी बोलते तेव्हा पुस्तक प्रकाशन आणि काव्य संमेलन संपन्न

तर सदर काव्यसंग्रह प्रकाशित करणाऱ्या रंगतदार प्रकाशनचे विजय जोगमार्गे यांनी स्वतः बोलतात कमी परंतु कवितेतून व्यक्त होऊन खूप बोलतात असे कवी हेंबाडे यांचा काव्यसंग्रह आम्ही प्रकाशित केला याचा आम्हाला विशेष आनंद आहे असे सांगितले. यावेळी उपस्थित कवी आणि कवियत्री यांनी विविध प्रकारच्या विषयांवर कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.सदर कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार अशोक पाटील,बालभारती पुणेचे सदस्य ललित पाटील, प्राध्यापक बी.आर.निकम, पी.बी.झुंझारराव, नितीन जव्हारकर आदी मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन श्रद्धा जोगमार्गे यांनी केले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

कांदा जेवणातून गायब होणार कांद्याचा दर गगनाला भिडणार

Team webnewswala

केशरी कार्डधारकांना जून च्या अन्नधान्याचे वितरण

Web News Wala

मोदी काळात अदानी, अंबानी सह 4.12 लाख कुटुंबांना अच्छे दिन

Web News Wala

Leave a Reply