Team WebNewsWala
तंत्रज्ञान

WhatsApp New Feature : Multiple Device Login होणार सुरू

जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप वादात अडकलेले असतानाच आपल्या यूजर्ससाठी अनेक उत्तम फीचर्स लॉन्च करण्याच्या तयारीत WhatsApp आहे. Multiple Device Login सेवा होणार सुरू

WhatsApp New Feature : Multiple Device Login होणार सुरू 

Webnewswala Online Team – सध्या आपल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवरून जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप वादात अडकलेले असतानाच आपल्या यूजर्ससाठी अनेक उत्तम फीचर्स लॉन्च करण्याच्या तयारीत WhatsApp आहे. Multiple Device Login सेवा होणार सुरू

WhatsApp चे हे नवीन फीचर्स चॅटिंगचा अनुभव आकर्षक बनवू शकतात. या फीचर्सची सध्या टेस्टिंग घेण्यात येत असून हे फिचर येत्या काही आठवड्यात यूजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

WhatsApp कडून लवकरच यूजर्सना अ‍ॅपचा कलर बदलण्याचे आकर्षक फीचर मिळणार आहे. या फीचरद्वारे यूजर चॅट बॉक्सचा आणि टेक्स्टचा रंग बदलू शकतील. यामुळे युजर्सच्या चॅटिंगचा अनुभव आणखी चांगला होणार आहे. सध्या हे फीचर टेस्टिंग मोडमध्ये असून ते लवकरच सुरू लाँच केले जाऊ शकते. त्याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅपकडून वेळोवेळी इमोजी आणि स्टिकर्स अपडेट केले जातात.

आणखी एक चांगले फीचर लॉन्च करण्याची व्हॉट्सअ‍ॅपने तयारी केली आहे, ज्याचा वापर करून चॅट दरम्यान यूजर स्टिकर वापरू शकतील. सोप्या भाषेत, जेव्हा यूजर्स चॅटिंग दरम्यान एखादे वाक्य लिहितील, तेव्हा व्हॉट्सअ‍ॅपकडून त्यानुसार स्टिकरचे सजेशन मिळेल. त्यामुळे शब्दांऐवजी स्टिकर पाठवून चॅटिंग आणखी आकर्षक बनवू शकाल.

इतर अनेक फीचर्सवरही WhatsApp काम करत आहे, जे यूजर्ससाठी खूप उपयुक्त ठरतील. व्हॉट्सअ‍ॅप लवकरच एक फीचर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, ज्याद्वारे यूजर्स त्यांच्या अकाऊंटमधून लॉग आउट करू शकतील. तसेच एकाच वेळी एकाहून अधिक डिव्हाइसवर ( Multiple Device Login ) WhatsApp वापरता येईल.

Web Title – WhatsApp New Feature : Multiple Device Login होणार सुरू ( WhatsApp New Feature : Multiple Device Login will be launched )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

नवीन फिचर्स आणत Telegram ची Wats app ला टक्कर

Team webnewswala

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Storm R3 ची बुकिंग सुरू

Web News Wala

करोना काळात तंत्रज्ञानाची मोठी मदत, 5G वर लक्ष देण्याची गरज

Team webnewswala

Leave a Reply