Team WebNewsWala
Other मनोरंजन शहर सिनेमा

चित्रपटाची कमाई जाणून तुम्हाला काय करायचंय ? पंकज त्रिपाठी

What do you want to do knowing the earnings of the film ?; Pankaj Tripathi

आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता पंकज त्रिपाठी ने चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून प्रेक्षकांना टोला लगावला आहे.

एखाद्या चित्रपटाने किती कोटी रुपये कमावले, हे जाणून घेऊन तुम्हाला काय मिळणार आहे, असा सवाल त्याने प्रेक्षकांना केला आहे.
‘गुंजन सक्सेना’ या आगामी चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिलेल्या एका ऑनलाइन मुलाखतीत पंकज त्रिपाठी ने हे विधान केलं.
What do you want to do knowing the earnings of the film ?; Pankaj Tripathi

“सामान्य जनतेला बॉक्स ऑफिस कलेक्शनपेक्षा त्यांच्या राज्याचा आरोग्य व शिक्षणासाठी किती बजेट आहे याची काळजी जास्त असली पाहिजे. शिक्षणासाठी सरकारने किती बजेट दिला आहे, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे.

पण बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये लोकांना का रस आहे हेच मला कळत नाही. त्यांना त्या कलेक्शनचा नफासुद्धा मिळत नाही तरी कमाईत फार रस असतो. त्यातून तुम्हाला काय मिळतं”, असा प्रश्न त्याने प्रेक्षकांना विचारला आहे.

नक्की वाचा >> गुंजन सक्सेना – द कारगिल गर्लचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

‘गुंजन सक्सेना’ या बायोपिकमध्ये पंकज त्रिपाठी गुंजनच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट कारगिल युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

भिवंडी अतिक्रमण विभागाची कारवाई, भाजपाचे कार्यालय जमीनदोस्त

Web News Wala

SADAK 2 ट्रेलर रिलीज होताच काही तासांतच लाखो डिसलाइक्स

Team webnewswala

आता OTT Platform लाही केंद्राची नियमावली

Web News Wala

3 comments

Leave a Reply