Team WebNewsWala
Other नोकरी पर्यावरण शहर

ग्रामीण भागात राहणाऱ्या आदिवासींना ओल्या गवतामुळे रोजगार

वाडा तालुक्यात दुर्गम, ग्रामीण भागात राहणाऱ्या आदिवासींना ओल्या गवतामुळे रोजगार उपलब्ध होत आहे. दहिसर, आरे कॉलनी, येथील गोठय़ांमुळे आदिवासींचा आर्थिक पेच सुटला
वाडा तालुक्यात दुर्गम, ग्रामीण भागात राहणाऱ्या आदिवासींना ओल्या गवतामुळे रोजगार उपलब्ध होत आहे. मुंबई, दहिसर, आरे कॉलनी, कामण येथील गोठय़ांमुळे आदिवासींचा आर्थिक पेच सुटला

वाडा : करोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्वच क्षेत्रातील लाखो कामगारांचा रोजगार बुडाला आहे. मात्र वाडा तालुक्यात दुर्गम, ग्रामीण भागात राहणाऱ्या आदिवासींना ओल्या गवतामुळे रोजगार चांगला रोजगार उपलब्ध होत आहे.

शहरी भागातील गोठय़ातील म्हैशींना ओला चारा म्हणून ओल्या गवताला खूपच मागणी असते. पावसाळ्यातील तीन महिने ओल्या चाऱ्याचा हा व्यवसाय ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर केला जातो. या व्यवसायातून अनेक कुटूंबांचा अर्थिकस्तर उंचावण्यास मदत झाल्याचे दिसून येते.

वाडा तालुक्यात मोठय़ा प्रमाणात ओसाड माळरान आहे. विशेषत: तालुक्यातील परळी, ओगदा, उज्जेनी या दुर्गम व आदिवासी भागात मोठय़ा प्रमाणावर असलेल्या माळरानावरील गवत येथील शेतकऱ्यांकडून व्यापारी विकत घेतात. ते याच परिसरातील आदिवासी मजुरांकडून हे गवत कापून घेऊन त्याची विक्री करीत असतात.

ओले (हिरवे) गवत कापण्याचे दर मजुरांना गवत व्यापाऱ्यांकडून ठरवून दिलेले असतात. ५० किलो गवत कापणे व ते वाहतूक करणाऱ्या वाहनापर्यंत पोहचविण्यासाठी २५ रुपये मजुरी दिली जाते.

प्रतिदिन साडे तिनशे ते चारशे रुपयांपर्यंत मजुरी

एक मजूर प्रतिदिन ७०० ते ८०० किलो पर्यंत गवत कापून त्याची वाहनापर्यंत वाहतूक करीत असल्याने त्याला साडे तिनशे ते चारशे रुपयांपर्यंत मजुरी मिळते. वाडा तालुक्यात विविध ठिकाणी ओल्या गवताची कापणी व त्याची  विक्री सुरू असून वाडा तालुक्यातील अनेक गवत व्यापारी या दोन महिन्यांमध्ये स्वत:च्या मालकीचा अथवा भाडय़ाने ट्रक घेऊन या व्यवसायात उतरले आहेत.

वाडा तालुक्यातून दररोज पन्नासहून अधिक ट्रक ओले गवत मुंबई, दहिसर, आरे कॉलनी, कामण येथील म्हैशींच्या गोठय़ांमध्ये हिरवा चारा म्हणून जात असतो.

वाडा तालुक्यात ग्रामीण भागात राहणाऱ्या आदिवासींना ओल्या गवतामुळे रोजगार मिळत आहे. दहिसर, आरे कॉलनी, येथील गोठय़ांमुळे आदिवासींचा सुटला पेच

भात लागवडीची कामे पुर्ण झाल्यानंतर या भागातील मजुरांना अन्य कुठल्याही प्रकारचा रोजगार नसल्याने या तीन महिन्यांच्या कालावधीत ओल्या गवताच्या माध्यमातून चांगला रोजगार उपलब्ध झाल्याने आदिवासींमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

विशेषत: वाडा तालुक्यात पाच हजारांहून अधिक वनपट्टेधारक आहेत. जंगलामध्ये दिलेल्या वनपट्टय़ाच्या माल वर्कस जागेतील गवत विक्रीतूनही चांगले पैसे वनपट्टेधारकांना मिळत आहेत.

वणव्याचे प्रमाण रोखण्यास मदत

जंगल परिसरातील ओले गवत कापले जात असल्याने जंगलात नव्याने लागवड केलेल्या झाडांची चांगली वाढ होते, तसेच गवत वेळीच कापले गेल्याने उन्हाळ्यात लागत असलेल्या वणव्यांचे प्रमाण कमी होते व जंगलांचे संरक्षण होते. या वर्षी टाळेबंदीमुळे अन्य व्यवसाय अडचणीत आले असताना या ओल्या गवताच्या व्यवसायाने अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिल्यामुळे या वाढत्या महागाईत अनेकांचे संसार या व्यवसायाने तारले आहेत.

गवत कापणीतून घरातील सर्वानाच रोजगार मिळत असल्याने कुटुंबाचा संसार गाडा सुखाचा सुरू आहे.

– विष्णू फडवळे, मजूर, चारणवाडी (वरसाळे), ता. वाडा.

ओल्या गवताचा व्यवसाय चांगला आहे. मात्र करोनाच्या टाळेबंदीमुळे यावेळी माल वाहतूक करणे खूप त्रासदायक ठरत आहे.

– दिलीप पाटील, गवत व्यापारी, वाडा.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

गंगेत सापडला Suckermouth catfish तज्ज्ञांकडून चिंता

Team webnewswala

उत्तराखंड प्रमाणे हैद्राबादमध्ये बद्रीनाथ धाम

Team webnewswala

मिठी नदीला आला पूर, महिलेसह तीन मुली गेल्या वाहून

Team webnewswala

Leave a Reply