Team WebNewsWala
आरोग्य

Weight loss : ‘या’ चुकांमुळे वाढते चरबी, जाणून घ्या कसे

Weight loss : लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपल्यापैकी बरेचजण वेगवेगळे डाएट प्लॅन करतात. पोटाच्या आसपासच्या भागात जमा असलेल्या चरबीला बेली फॅट असे म्हणतात.

Weight loss : ‘या’ चुकांमुळे वाढते चरबी, जाणून घ्या कसे

Webnewswala Online Team – Weight loss : लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपल्यापैकी बरेचजण वेगवेगळे डाएट प्लॅन करतात. पोटाच्या आसपासच्या भागात जमा असलेल्या चरबीला बेली फॅट असे म्हणतात. विशेषता बेली फॅट कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. मात्र, अनेक डाएट प्लॅन करूनही बेली फॅट कमी होत नाही. चुकीच्या जीवनशैलीमुळे बेली फॅट वाढतो. परंतु आपण्यास हे माहिती आहे का ? की, काही सवयींचे पालन केल्याने कुठल्याही प्रकारचे डाएट न करता आपण बेली फॅट कमी करू शकतो.

डाएटमध्ये पौष्टिक अन्नाचा अभाव

जेव्हा पोटावरील चरबी कमी करण्याचा विचार केला जातो तेव्हा कॅलरी नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे. कॅलरी कमी करण्यासाठी, आपण आहारातील पौष्टिक घटक देखील कमी करतो. यामुळे, शरीरात स्नायू आणि पाण्याची कमतरता होते. त्यामुळे आपल्या पोटाची चरबी कमी होत नाही तर वाढते.

पुरेसे पाणी न पिणे

वजन कमी करण्यासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पाणी पिल्याने आपल्याला बराच काळ भूक देखील लागत नाही. यासाठी जेवन करण्याच्या अगोदर भरपूर पाणी प्या. कारण यामुळे अन्नाची तल्लफ कमी होते आणि कॅलरीचे प्रमाण देखील कमी होते. जर आपण पुरेसे पाणी पित नसाल तर पोटावरील चरबी कमी करणे कठीण होते.

ताण

एका अभ्यासामध्ये असा दावा केला आहे की, तणावामुळे शरीरात कोर्टिसॉल हार्मोनचे प्रमाण वाढते, जे चयापचय कमी करण्यास मदत करते. जर आपला चयापचय दर कमी असेल तर वजन कमी करणे कठीण आहे. जरी आपण वर्कआउट केले तरी आपले वजन वाढते.

झोपेचा अभाव

आपण जर पुरेशी झोप घेत नसाल तर आपले वजन वाढते. यामुळे शरीरात कोर्टिसोलचे प्रमाण वाढते आणि आपण जास्त कॅलरीयुक्त अन्न खातो. म्हणूनच आपल्याला किमान 7 ते 8 तासांची झोपे घेणे महत्वाचे आहे. झोप व्यवस्थित घेतली तर आपले वजन कमी होण्यास मदत होते.

शारीरिक हालचाली

जर आपण दिवसभर कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला नाही तर वजन कमी करणे खूप कठीण आहे. वजन कमी करण्यासाठी दररोज व्यायाम करा. व्यायाम केल्याने आपण कॅलरी बर्न करू शकतो. व्यायाम करणे फक्त वजन कमी करण्यासाठीच फायदेशीर नाही तर व्यायाम केल्याने आपले आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते.

Web Title – Weight loss : ‘या’ चुकांमुळे वाढते चरबी, जाणून घ्या कसे ( Weight loss : Read the reasons for growing belly fat )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

भारत पहिल्या टप्प्यात देणार सहा देशांना कोरोना लस

Web News Wala

१ ऑक्टोबरपासून नवे बदल होणार गॅस सिलेंडरपासून आरोग्य विम्यापर्यंत

Team webnewswala

त्वचेवर येणारे डाग घालवण्याचे उपाय

Team webnewswala

Leave a Reply