Team WebNewsWala
Other नोकरी शहर समाजकारण

पुण्यात सुरु झाले वॉरिअर आजीबाई चे मार्शल आर्ट्स क्लास

‘वॉरिअर आजीबाईं’ चा व्हिडीओ व्हायरल झाला. अभिनेता सोनू सूद ने वॉरिअर आजीबाईं च्या मदतीसाठी मुलींना सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण देणारे वर्ग सुरु

मागील महिन्यात सोशल मीडियात लाठ्या-काठ्या सफाईदारपणे फिरवणाऱ्या ‘वॉरिअर आजीबाईं’ चा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. अभिनेता रितेश देशमुखनेही कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काठ्यांचा खेळ सादर करणाऱ्या या आजींचा व्हिडिओ शेअर केला होता.

सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा व्हिडीओ अभिनेता सोनू सूद ने याच्या नजरेत देखील पडला होता. त्यानंतर त्याने तात्काळ या आजीबाईंची मदत करण्याचा मानस व्यक्त केला होता. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोनूने दिलेला शब्द खरा करुन दाखवला आणि वॉरिअर आजीबाईं च्या मदतीसाठी त्याने मुलींना सेल्फ डिफेन्सचे धडे देणारे प्रशिक्षण वर्ग सुरु केले आहेत.

नक्की वाचा >>

देशातील पहिली किसान रेल्वे, शेतकऱ्यांना होणार फायदा

१५ ऑगस्ट रोजी ठाण्यात रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री

मॉरिशस तेल गळती; जपानी जहाजाचे झाले दोन तुकडे

यासंदर्भातील व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफ्र असणाऱ्या मानव मंगलानीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून ८५ वर्षीय शांताबाई पवार या व्हिडिओमध्ये सोनू सूदचे आभार मानताना दिसत आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोनू सूदने वॉरिअर आजी शांताबाई पवार यांच्यासाठी मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण वर्ग सुरु केले असून या आजींचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. प्रवाशांसाठी देवदूत झालेल्या सोनूने या आजींनी इतर महिला आणि लहान मुलांना सेल्फ डिफेन्सचे धडे द्यावे या उद्देशाने हे प्रशिक्षण वर्ग सुरु केल्याचे असे या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

प्रशिक्षण वर्गाचे नाव सोनू सूद मार्शल आर्ट्स स्कूल

या पोस्टमध्ये पुढे दिलेल्या माहितीनुसार सोनू सूद चे आभार मानण्यासाठी या प्रशिक्षण वर्गाचे नाव सोनू सूद मार्शल आर्ट्स स्कूल असे ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर या प्रशिक्षण वर्गाला आपण लवकरच भेट देऊ असा शब्दही सोनूने दिला आहे. सोनूने सुरु केलेल्या या प्रशिक्षण वर्गाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी इन्स्टाग्रामवरुन सोनूचे कौतुक केले असून आजींना त्यामुळे मदत होण्याबरोबरच महिलांना स्वत:च्या संरक्षणाचे धडे घेता येणार असल्याने आनंद द्विगुणीत झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पवई IIT चा ‘बोधीट्री’ आता सर्वांना उपलब्ध

Team webnewswala

राज्यपालांनी लॉकडाउनमध्ये लिहिली १३ पुस्तके

Team webnewswala

Labour codes मोदी सरकार करणार नवे कामगार कायदे लागू

Web News Wala

Leave a Reply