Team WebNewsWala
राष्ट्रीय व्यापार

व्होडाफोन-आयडिया चे दोन ‘पॉप्युलर’ प्लॅन्स महाग

टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडिया ने आपल्या युजर्सना झटका दिलाय. कारण कंपनीचे दोन लोकप्रिय पोस्टपेड प्लॅन्स आता महाग झाले आहेत.

टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडिया ने आपल्या युजर्सना झटका दिलाय. कारण कंपनीचे दोन लोकप्रिय पोस्टपेड प्लॅन्स आता महाग झाले आहेत. कंपनीच्या 598 आणि 749 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनसाठी आता युजर्सना 50 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. म्हणजे 598 रुपयांच्या प्लॅनसाठी आता 649 रुपये, आणि 749 रुपयांच्या प्लॅनसाठी आता 799 रुपये मोजावे लागतील. नव्या किंमतीसह हे दोन्ही प्लॅन कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट झाले आहेत. हे दोन्ही प्लॅन कंपनीच्या RED फॅमिली प्लॅनचा हिस्सा आहेत.

Vodafone Idea – 649 रुपये आणि 799 रुपयांचे फायदे :-

649 रुपयांच्या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसोबत दर महिन्याला एकूण 80 जीबी डेटा आणि एकूण 100 एसएमएसची सुविधा मिळते. या प्लॅनअंतर्गत तुम्ही दोन कनेक्शन वापरु शकतात. 80 जीबी डेटापैकी 50 जीबी डेटा मुख्य युजरला आणि उर्वरीत 30जीबी डेटा अन्य युजरला मिळतो.

799 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 120 जीबी डेटा वापरण्यास मिळतो. या प्लॅनअंतर्गत तीन कनेक्शनचा सपोर्ट मिळतो. 120 जीबी डेटापैकी 60जीबी डट मुख्य युजरला आणि अन्य दोन युजरसाठी 30-30जीबी डेटा मिळतो.

या दोन्ही प्लॅनमध्ये एका वर्षासाठी अ‍ॅमेझॉन प्राइम, झी-5 आणि Vi मूव्हीज अँड टीव्हीचं फ्री सब्सक्रिप्शन मिळतं.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Amazon Flipkart च्या मराठी अँप साठी मनसे आक्रमक

Team webnewswala

७००० रुपये प्रति लिटर गाढविणीच्या दुधाची देशातील पहिली डेअरी

Team webnewswala

सरकारचा पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचा निर्णय

Web News Wala

Leave a Reply