Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय क्रीडा

229 कोटी रुपये कमवत विराट ‘फोर्ब्स’ यादीत

फोर्ब्सच्या या यादीतील पहिल्या १०० खेळाडू मध्ये विराट एकमेव क्रिकेटर असून 229 कोटी रुपये कमवत विराट 'फोर्ब्स' यादीत ५९ व्या स्थानावर.

आता पॅच चिकटवून घ्या करोना लस

Webnewswala Online Team – टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली याने सलग पाचव्या वर्षी एक वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळविले आहे. फोर्ब्सच्या या यादीतील पहिल्या १०० खेळाडू मध्ये विराट एकमेव क्रिकेटर असून तो ३१.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे 229 कोटी रुपये कमवत विराट ‘फोर्ब्स’ यादीत ५९ व्या स्थानावर आला आहे. गतवर्षी या यादीत विराट २६ दशलक्ष डॉलर्स म्हणजे १९७ कोटी रुपये कमावून ६६ व्या स्थानावर होता.

विराट आयपीएल मध्ये बंगलोर चँलेंजर्सचा कप्तान आहे. १२ महिन्यात त्याने कमावलेल्या २२९ कोटी पैकी २५ कोटी त्याला वेतन म्हणून मिळाले आहेत तर बाकी २०४ कोटींची कमाई त्याने जाहिरातीतून केली आहे. २०१९ मध्ये विराट १८९ कोटीच्या कमाईसह या यादीत १०० व्या नंबरवर होता.

टेनिस स्टार रोजर फेडरर गतवर्षी अव्वल स्थानी होता मात्र यावर्षी तो सातव्या क्रमांकावर गेला असून त्याची कमाई आहे ६१२ कोटी.

या यादीत १ नंबरवर मिक्स्ड मार्शल आर्ट खेळाडू कॉर्नर मेकग्रेगर असून त्याची कमाई आहे १५१७ कोटी. त्याखालोखाल फुटबॉल खेळाडू लियोनेल मेस्सी यांचा नंबर असून त्याची कमाई ९१९ कोटी तर फुटबॉलपटू रोनाल्डोची कमाई ८७५ कोटी असून तो तीन नंबरवर आहे. या यादीत दोन महिला असून दोघी टेनिस खेळाडू आहेत. जपानची नियोमी ओसावा ४०२ कोटींच्या कमाई सह महिला वर्गात पहिल्या तर एकूण यादीत १५ व्या क्रमाकांवर आहे तर सेरेना विलियम्स २५९ कोटीच्या कमाईसह ४४ व्या नम्बरवर आहे.

Web Title – 229 कोटी रुपये कमवत विराट ‘फोर्ब्स’ यादीत  ( Virat earns Rs 229 crore in Forbes list )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

Go SMS Pro हे अ‍ॅप गुगलने प्ले स्टोअरवरुन हटवलंय.

Team webnewswala

जगात सर्वप्रथम कोरोना लस घेतलेल्या विल्यम शेक्सपिअर यांचे निधन

Web News Wala

आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा दबदबा

Team webnewswala

Leave a Reply