क्राईम शहर

नाईट क्लब मध्ये Social Distancing च्या नियमांचा भंग

टाळेबंदीच्या टप्प्यात मिळालेल्या परवानगीचा गैरफायदा घेत मुंबईतील नाईट क्लब मध्ये रात्रभर सुरू असलेल्या धिंगाण्यामुळे करोनाचा धोका वाढू लागला आहे
मुंबई : टाळेबंदी शिथिलीकरणाच्या टप्प्यात मिळालेल्या परवानगीचा गैरफायदा घेत मुंबईतील ‘नाइट क्लब’ मध्ये रात्रभर सुरू असलेल्या धिंगाण्यामुळे करोनाचा धोका वाढू लागला आहे. मुखपट्टी न घालता, शारीरिक अंतराचे नियम धाब्यावर बसवून या ठिकाणी गर्दी जमत असल्याचे पालिकेच्या छाप्यात समोर आले. त्यानंतर लोअर परळ आणि वांद्रे येथील दोन क्लबविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर करोना निर्बंधांचे पालन होत नसल्याने मुंबईत रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करावी, अशी शिफारसच पालिका आयुक्त इक्बाल सिंह यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

करोनामुळे कोणत्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये याकरिता केवळ ५० लोकांनाच परवनागी दिली जाते. तसेच सामाजिक अंतराचा नियम पाळण्याचे व सार्वजनिक ठिकाणी मुखपट्ट्या लावण्याचेही बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र मुंबईतील ‘नाइट क्लब’ मध्ये हे सर्व नियम धुडकावून लावले जात आहेत. या क्लबमध्ये हजारोनी गर्दी जमत असते. तसेच हे क्लब पहाटे चार वाजेपर्यंत सुरू असतात. महानगरपालिकेने लोअर परळ येथील तोडी मिल कपाऊंडमधील ‘एपिटोम क्लब’ मध्ये तसेच वांद्रे येथील एका क्लबवर धाडी टाकल्या असता ही बाब उघडकीस आल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली. या पाश्र्वाभूमीवर महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याची लेखी शिफारस राज्य सरकारकडे केली आहे.

‘राज्य सरकार संचारबंदी लागू करण्याच्या विचारात नाही. तसेच लोकांमध्ये विनाकारण घबराट निर्माण करण्याचा हेतू नाही. मात्र नागरिकांनी काळजी घेतली नाही तर मात्र कठोर पावले उचलावी लागतील,’ असा इशाराच पालिका आयुक्तांनी दिला.

६७ जणांना दंड

महापालिकेचे पथक या क्लबमध्ये पोहचले तेव्हा तेथे किमान दोन-अडीच हजार लोक जमले होते. तर पालिकेचे पथक येत असल्याची कुणकुण लागताच काही जण तात्काळ बाहेर निघून गेले. क्लबमध्ये करोनाचे सगळे नियम पायदळी तुडवले जात होते, असे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.

यावेळी ध्वनिक्षेपकावरून लोकांना मुखपट्ट्या लावण्याचे आवाहनही करण्यात आले. क्लीन अप मार्शलनी ६७ लोकांकडून यावेळी दंड वसूल केला. या कारवाईनंतर आयुक्तांनी सर्व प्रभागातील साहाय्यक आयुक्तांना त्यांच्या प्रभागातील नाइट क्लबवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

फटाके बंदी मुळे यावर्षी मुंबईमध्ये प्रदुषणात घट

Team webnewswala

विनापरवानगी वृक्षतोड / वृक्षछाटणी करणा-यांवर दखलपात्र गुन्हे

Team webnewswala

चित्रपटाची कमाई जाणून तुम्हाला काय करायचंय ? पंकज त्रिपाठी

Team webnewswala

Leave a Reply