Team WebNewsWala
क्राईम क्रीडा शहर

सचिन तेंडुलकर कडून गोल्फ साठी कोरोना नियमांचं उल्लंघन ?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने गोल्फ खेळण्यासाठी कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याची चर्चा. 'पुणे मिरर' नं हे वृत्त दिलं आहे.

सचिन तेंडुलकर कडून गोल्फ साठी कोरोना नियमांचं उल्लंघन ?

Webnewswala Online Team – सध्या महाराष्ट्रासह देशातील बहुतेक भागात कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) कडक निर्बंध लागू आहेत. या लॉकडाऊनमध्ये कोणतेही मैदानी खेळ खेळण्यास बंदी आहे. त्याचवेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने गोल्फ खेळण्यासाठी कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याची चर्चा आहे. ‘पुणे मिरर’ नं हे वृत्त दिलं आहे. पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्टमध्ये (Oxford Golf Resort) सचिन अजित आगरकरसह (Ajit Agarkar) शुक्रवारी उपस्थित होता. या दोघांनी रिसॉर्टमध्ये गोल्फ खेळण्याचा आनंद लुटला अशी माहिती या वृत्तामध्ये देण्यात आलेली आहे.

पुणे मिररच्या वृत्तानुसार, ” ऑक्सफोर्ड गोल्फ रिसॉर्टमधील VVIP पार्किंगमध्ये शुक्रवारी ग्रे सिल्वर रंगाची कार आढळली होती. RTO च्या रेकॉर्डनुसार ही कार सचिनच्या मालकीची आहे. सचिनला मुंबईहून पुण्यात येण्यासाठी ई पास मिळाला होता का? कोरोना काळातील निर्बंधांचं गोल्फ कोर्सच्या मॅनेजमेंटनं उल्लंघन केले का? या सारखे प्रश्न पार्किंग भागात ही कार आढळल्याने निर्माण झाले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात सर्व खेळांवर बंदी आहे.

पुणे शहरातील गोल्फ कोर्सकडून सध्या कोरोना काळातील गाईडलाईन्सचे पालन करण्यात येत आहे. हे सर्व गोल्फ कोर्स सध्या बंद आहेत. मात्र पुणे शहराच्या बाहेर लवाळे जवळ असलेल्या या गोल्फ कोर्समध्ये सर्व प्रकारचे नियम धाब्यावर बसवले असल्याचा दावा या वृत्तामध्ये करण्यात आला आहे.

मॅनेजमेंटचा दावा काय ?

सचिन तेंडुलकर शुक्रवारी गोल्फ खेळण्यासाठी आल्याच्या वृत्ताला येथील सुरक्षा रक्षकांनीही दुजोरा दिला आहे. ‘प्रसिद्ध क्रिकेटपटू येणार असून त्यामुळे दक्ष राहा, अशी सूचना आम्हाला शुक्रवारी सकाळी देण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. सचिन तेंडुलकर आणि अजित आगरकर हे गोल्फ खेळण्यासाठी आले असल्याची माहिती देखील या सुरक्षा रक्षकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

या गोल्फ कोर्सचे व्यवस्थापक कमल दुबे यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या क्लबचा मेंबर असलेल्या अजित आगरकरसोबत सचिन गोल्फ खेळण्यासाठी आला होता. कोरोना काळात ज्या खेळांवर बंदी घातलेली आहे, त्यामध्ये गोल्फचा समावेश नाही. त्यामुळे आम्ही सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून आमच्या मेंबर्सना गोल्फ खेळण्याची परवानगी देतो, असा दावा दुबे यांनी केला आहे.

जिल्हा प्रशासन करणार चौकशी

पुणे जिल्हा प्रशासनानं दुबे यांनी केलेला दावा फेटाळला आहे. गोल्फ कोर्समध्ये सुरु असलेले हे प्रकार कोरोना काळातील गाईडलाईन्सचे उल्लंघन आहे. या गोल्फ कोर्सला कोणतीही विशेष परवानगी देण्याचा प्रश्नच नाही. ऑक्सफोर्ड गोल्फ रिसॉर्टमधील प्रकाराबाबत आमच्याकडे नुकतीच तक्रार आली आहे. मी या प्रकारणात घटनास्थळी टीम पाठवली असून याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल.” असे स्पष्टीकरण मावळ आणि मुळशी विभागाचे उपविभागीय आयुक्त संदेश शिर्के यांनी दिली आहे.

Web Title – सचिन तेंडुलकर कडून गोल्फ साठी कोरोना नियमांचं उल्लंघन ? ( Violation of corona rules by Sachin Tendulkar for playing golf? )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

नाशिकचा आर्यन शुक्ल ज्युनिअर मेंटल मॅथ्स स्पर्धेत विश्वविजेता

Team webnewswala

विक्रम गोखले यांच्यासह 14 जणांवर फसवणुकीचा गुन्हा

Team webnewswala

राज्यात सलग पंधरा महिन्यांचा पावसाळा

Web News Wala

Leave a Reply