Team WebNewsWala
क्राईम शहर

Zomato डिलिव्हरी बॉय ने महिलेला मारहाण केल्याचा Video viral

Zomato डिलिव्हरी बॉय ने महिलेला मारहाण केल्याचा Video viral

झोमॅटो (zomato) अ‌ॅपवरुन जेवण ऑर्डर करुन ते कॅन्सल केल्यामुळे डिलीव्हरी बॉयने चक्क महिलेला मारहाण केल्याचा दावा करणारा व्हिडीओ एका महिलने शेअर केला होता. पोलिसांनी त्या डिलीव्हरी बॉयला अटक केली असून zomato नं त्याला कामावरुन देखील हटवलं आहे.

याप्रकरणी डिलीव्हरी बॉयचा वेगळाच दावा

कामराज असं त्या zomato डिलीव्हरी बॉयचं नाव आहे त्यानं याप्रकरणी वेगळाच दावा केला आहे. ऑर्डर पोहोचवण्यास उशीर झाल्यानं सबंधित महिलेने शिवीगाळ करत चप्पलनं मारहाण केल्याचा दावा डिलीव्हरी बॉयनं केला आहे.

डिलीव्हरी बॉयचा दावा काय ?

zomato वरुन जेवण ऑर्डर करुन ते कॅन्सल केल्यामुळे डिलीव्हरी बॉयने चक्क महिलेला मारहाण केल्याचा दावा करणारा व्हिडीओ एका महिलने शेअर केला

zomato डिलीव्हरी बॉयनं त्या महिलेच्या घरी पोहोचून ऑर्डर दिली आणि पैसे मिळण्याची वाच पाहत होतो. संबंधित महिलेने कॅश ऑन डिलीव्हरी हा पर्याय स्वीकारला होता. ऑर्डर पोहोचवण्यासाठी उशीर झाल्यानं त्या महिलेची माफी मागितली होती तरी त्या रागावलेल्या होत्या, असं कामराज यानं सांगतिलं. ट्रॅफिक जास्त असल्यानं आणि रस्ता खराब असल्यानं पोहोचण्यास उशीर झाल्याचं सांगितलं. महिलेनं पार्सल घेतल्यानंतर पैसे देण्यास नकार दिला होता आणि त्या झोमॅटो चॅट सपोर्टशी बोलत होत्या.

ऑर्डर रद्द केल्यानंतर ती परत देण्यास नकार 

कामराज यांनं सांगितलक की त्या महिलेने zomato सपोर्टशी बोलताना ऑर्डर रद्द केली. ऑर्डर रद्द केल्यानंतर ती परत देण्यास नकार दिला. यांनतर बिल्डींगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यास त्या महिलेने चप्पलनं मारहाण केली आणि स्वत:च्या अंगठीनं नाकावर मारुन घेत जखम केली. कामराज यानं ही बाजू द न्यूज मायन्यूट यापोर्टलशी बोलताना मांडली आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

भिवंडी वीज कंपनीच्या विद्युत केबल आगीत जळून खाक

Web News Wala

गोरेगाव-पनवेल हार्बर गाड्यांची संख्या वाढणार

Web News Wala

राज्यात सलग पंधरा महिन्यांचा पावसाळा

Web News Wala

Leave a Reply