Team WebNewsWala
Other पर्यावरण व्यापार शहर

मुंबईत ट्रेन बंद असल्याने वसईची फुलशेती संकटात

मुंबईत ट्रेन बंद असल्याने वसईची फुलशेती संकटात सापडली असुन जास्वंद, मोगरा अशा विविध फुलांची वसईत शेती केली जात असून पाचशेहून अधिक शेतकरी फुल व्यवसात

मुंबईत ट्रेन बंद असल्याने वसईची फुलशेती संकटात सापडली असुन सदाफुली, जास्वंद, सोनचाफा,झेंडू,तागरा, मोगरा अशा विविध फुलांचे बारा महिने वसईत शेती केली जात असून  छोटे मोठे असे पाचशेहून अधिक शेतकरी फुल व्यवसात आहेत

मुंबई: गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कोरोनामुळे मुंबईतील रेल्वे सेवा बंद असल्यामुळे वसईच्या शेकडो फुल शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. दररोज सकाळी पहिल्या लोकलने वसईची फुले विक्रीसाठी मुंबईच्या बाजारात दाखल होतात. मात्र, आता रेल्वेसेवा बंद असल्याने शेतकऱ्यांना  फुले खाजगी वाहनाने मुंबईत न्यावी लागत आहेत. कामगारांचे पगार तसेच वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांना न परवडणारा असल्याने वसईचा फुल शेतकरी संकटात सापडला आहे.

लॉकडाऊन मुळे फुले अनेक महिने झाडावरच कोमजली

सदाफुली, जास्वंद, सोनचाफा,झेंडू,तागरा, मोगरा अशा विविध फुलांचे बारा महिने वसईत शेती केली जात असून  छोटे मोठे असे पाचशेहून अधिक शेतकरी फुल व्यवसात आहेत. लॉकडाऊन मुळे फुले अनेक महिने झाडावरच कोमजली होती मात्र आता व्यवहार सुरळीत झाले असले तरी रेल्वेसेवा सुरळीत होण्यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे शासनाने  नियम पाळून मालवाहतुकीसाठी फुल व्यावसायिकांना मुभा द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

मुंबईत ट्रेन बंद असल्याने वसईची फुलशेती संकटात सापडली असुन जास्वंद,  मोगरा अशा विविध फुलांची वसईत शेती केली जात असून पाचशेहून अधिक शेतकरी फुल व्यवसात

त्यामुळे रस्ते वाहतुकीवरही मोठा ताण येताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी मनसेकडून मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यासाठी सविनय कायदेभंग करण्यात येणार आहे. रेल्वे पोलिसांकडून आंदोलन न करण्याची नोटीसद्वारे सूचना देण्यात आली आहे. आंदोलन केल्यास नियमानुसार कारवाई करणार असल्याचं रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट’ साठी प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्री भेट

Web News Wala

ग्लोबल हब मध्ये कायमस्वरूपी रुग्णालय सुरू करा – नारायण पवार

Team webnewswala

रत्नागिरी मधील मच्छिमार जेलिफिश ने हैराण

Web News Wala

Leave a Reply