Team WebNewsWala
मनोरंजन राजकारण शहर

वैशाली माडे चा राष्ट्रवादी प्रवेश, दिली महत्वाची जबाबदारी

मराठी गायिका वैशाली माडे (Vaishali Made) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून वैशालीवर शुभेच्छांचा वर्षाव

वैशाली माडे चा राष्ट्रवादी प्रवेश, दिली महत्वाची जबाबदारी

Webnewswala Online Team –  प्रसिद्ध मराठी गायिका(Singer) वैशाली माडे (Vaishali Made) नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात(NCP) प्रवेश घेतला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून वैशालीवर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेता अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री धनंजय मुंडे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित वैशालीने पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्वीट करत वैशालीचं अभिनंदन केलं आहे.

 वैशाली माडे चा राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागात प्रवेश

वैशाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. मात्र सध्या महाराष्ट्रात कोरोना महामारीने थैमान घातला आहे. ही परिस्थिती बघून, वैशालीचा प्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आज ही प्रतीक्षा संपली आहे. आज वैशालीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अखेर प्रवेश केला आहे. वैशालीचा राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागात प्रवेश झाला आहे. तसेच तिची विदर्भ विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

वैशालीच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी तिचं स्वागत केलं आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा ट्वीट करत वैशालीला शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात वैशालीला पक्षात प्रवेश देण्यात आला आहे.

वैशाली माडेबद्दल सांगायचं झालं, तर वैशाली ही महाराष्ट्राची प्रसिद्ध गायिका आहे. मराठीसोबतचं तिने बॉलिवूडमध्ये सुद्धा आपलं कसब दाखवलं आहे. झी टीव्हीवरील ‘सारेगमप’ या शोची 2009 ची ती विजेती आहे. त्यानंतर ती प्रकाशझोतात आली होती. मनोरंजन क्षेत्रात अगदी कमी वयात तिने स्वतःचं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. बाजीराव मस्तानी या या चित्रपटातील पिंगा हे तिचं गाणं खुपचं प्रसिद्ध झालं होतं. तसेच तिने अलीकडेच आलेल्या कलंक या चित्रपटात देखील गाणं म्हटल आहे.

Web Title – वैशाली माडे चा राष्ट्रवादी प्रवेश, दिली महत्वाची जबाबदारी ( Vaishali Made’s entry into the NCP, given an important responsibility )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

सचिन वाझे प्रकरणात मनसे ची उडी

Web News Wala

Social Media नंतर OTT साठी 15 दिवसांची ‘डेडलाइन’

Web News Wala

ताजमहाल क्षेत्रातील 4000 झाड कापण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

Web News Wala

Leave a Reply