Team WebNewsWala
आरोग्य राष्ट्रीय

संपणार लसींचे टेन्शन, जून महिन्यात 12 कोटी लस

जून महिन्यात केंद्राला तब्बल 12 कोटी लस उपलब्ध होणार असल्याची माहिती रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली असून यामुळे देशभरात अनेक ठिकाणी लसींबाबत सुरू असलेले टेन्शन संपणार आहे.

संपणार लसींचे टेन्शन, जून महिन्यात 12 कोटी लस

Webnewswala Online Team – देशभरात कोरोनाच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असली तरी अनेक ठिकाणी लसटंचाईमुळे लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. मात्र लवकरच देशभरातील लसीकरण मोहिमेचा वेग वाढण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. जून महिन्यात केंद्राला तब्बल 12 कोटी लस उपलब्ध होणार असल्याची माहिती रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली असून यामुळे देशभरात अनेक ठिकाणी लसींबाबत सुरू असलेले टेन्शन संपणार आहे.

कोरोनाविरोधातील लढाई यशस्वी करण्यासाठी लसीकरण मोहिमेला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. सध्या देशभरात कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पुटनिक लस लसीकरणासाठी उपलब्ध आहेत. मात्र अनेक राज्यांत लसींचा तुटवडा जाणवू लागल्याने अनेक ठिकाणी लसीकरणाचा वेग मंदावला आहे. परिणामी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात असून याचीच गंभीर दखल घेत केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून दररोज लसींच्या पुरवठय़ाबाबत अधिक माहिती दिली जाते.

देशात आतापर्यंत एकूण 20.86 कोटी जणांना लस

त्यानुसार रविवारी दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत एकूण 20.86 कोटी जणांना लस टोचण्यात आली असून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात लवकरच 1.82 कोटी लस उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या घोषणेमुळे सर्वसामान्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून आता तरी आपल्याला लस मिळेल, असा विश्वास अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्राच्या धोरणानुसार प्रत्येक महिन्यात 50 टक्के लस या केंद्र सरकारकडून खरेदी केल्या जातात. त्यानंतर या लस राज्यांना पुरवल्या जातात. उर्वरित 50 टक्के लसी राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना खरेदीसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. देशभरात शनिवारी एकूण 28 लाख 9 हजार 436 जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

देशात 6.3 टक्के लस वाया 

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत एकूण 6.3 टक्के लस वाया गेल्याचे यावेळी समोर आले आहे. यात झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांव्यतिरिक्त तामीळनाडू, जम्मू-कश्मीर आणि मध्य प्रदेशात लस वाया गेल्याचे प्रमाण अधिक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले आहे. तामीळनाडूमध्ये हे प्रमाण 15.5 टक्के इतके नोंदविण्यात आले आहे.

सिरम 10 कोटी लस देणार

सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या वतीने केंद्र सरकारला जून महिन्यात कोविशिल्ड लसींचे तब्बल 9 ते 10 कोटी डोस पुरविण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात सिरमचे प्रकाश कुमार सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केले की, आपल्याला कळविण्यास आनंद होतो की, मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये अधिक प्रमाणात लसनिर्मिती केली जाणार आहे. मे महिन्यामध्ये तब्बल 6.5 कोटी लसींची निर्मिती केली होती. आता जून महिन्यात साधारणपणे 9 ते 10 कोटी लसींची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title – संपणार लसींचे टेन्शन, जून महिन्यात 12 कोटी लस ( Vaccine tension to end, 12 crore vaccines in June )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

Twitter ला टक्कर देणार स्वदेशी Tooter

Team webnewswala

आत्मनिर्भर भारत अ‍ॅप चॅलेंजला प्रचंड प्रतिसाद

Team webnewswala

Jio आणि Airtel मध्ये करार, JIo ग्राहकांना होणार फायदा

Web News Wala

Leave a Reply