Team WebNewsWala
आरोग्य शहर शिक्षण

परदेशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरु

शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे करोना प्रतिबंधक लसीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. परदेशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण "ड्राइव्ह' सुरु केली जाणार आहे,

परदेशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरु 

Webnewswala Online Team – शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे करोना प्रतिबंधक लसीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. अशा परदेशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरु केली जाणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश परदेशांत निश्‍चित झाले आहेत, अशांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.

महापौर मोहोळ म्हणाले, ‘कमला नेहरू रुग्णालयातील लसीकरण केंद्रात आपण हा विशेष ड्राइव्ह राबवत आहोत. नोंदणी न करता थेट ‘वॉक इन’ पद्धतीने या विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.

यासाठी मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस राखीव असतील. सकाळी 10 ते 5 या वेळेत विद्यार्थी-विद्यार्थिनींना लस उपलब्ध होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी आवश्‍यक कागदपत्रे आणि प्रवेश निश्‍चित झाल्याचे पुरावे सादर करणे बंधनकारक असेल’.

‘विद्यार्थ्यांची संख्या वाढली, तर हा ड्राइव्ह संपूर्ण आठवडाभर राबवण्याची आपली तयारी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकदम गर्दी करू नये. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रवेश निश्‍चित होऊनही केवळ लसीकरणासाठी विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण होऊ नये, या उद्देशाने आपण हा निर्णय घेतला आहे. याचा विद्यार्थ्यांना फायदा घ्यावा आणि लसीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी,’ असे आवाहनही महापौर मोहोळ यांनी केले आहे.

विदेशात जाणाऱ्या सर्वांसाठीच लसीकरण सुरू करावे 

शिक्षण, नोकरी किंवा इतर कामांसाठी विदेशात जाऊ इच्छिणाऱ्या काही जणांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा नागरिकांचे तातडीने लसीकरण करण्यासाठी लसीकरण केंद्रे स्थापन करावीत, अशी मागणी आज खासदार सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक यांनी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली. यासाठीचा पाठपुरावा आम्ही सुरूच ठेवणार असणार असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

Web Title – परदेशांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरु
(Vaccination “drive” for students going abroad )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

स्वातंत्र्य दिन व वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त ऑनलाइन कवी संमेलन

Team webnewswala

करोनाकाळात वृत्तपत्रांच्या रद्दीला तिप्पट भाव

Team webnewswala

Corona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग

Web News Wala

Leave a Reply