Team WebNewsWala
आरोग्य राष्ट्रीय

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना जवळच्या केंद्रावर लस

परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘वॉक इन’ पद्धतीने सुरु केलेल्या लसीकरण मोहीमेंतर्गत 195 विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण.

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना जवळच्या केंद्रावर लस

Webnewswala Online Team – दिव्यांग आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुलभ करण्यासाठी आता आणखी एक पाऊल उचलण्यात येत आहे. दिव्यांग आणि ज्यांचं अद्याप लसीकरण झालं नाही किंवा ज्यांनी आतापर्यंत केवळ पहिला डोस घेतलाय अशा 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी आता त्यांच्या राहत्या घराजवळच लसीकरण केंद्र उभारण्याची सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिली आहे.

नॅशलन एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड 19 या समितीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिव्यांग आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी निअर टू होम कोविड वॅक्सिन सेंटर (NHCVC) उभारण्याची शिफारस केली होती. ती शिफारस आता केंद्राने मान्य केली असून सर्व राज्यांना निअर टू होम कोविड वॅक्सिन सेंटर सुरु करण्याची सूचना दिली आहे.

निअर टू होम कोविड वॅक्सिन सेंटर (NHCVC) साठी पात्र नागरिक

1. 60 वर्षापरील सर्व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, ज्यांचं अद्याप लसीकरण झालं नाही किंवा एक डोस घेतला आहे.
2. सर्व दिव्यांग नागरिक

सरकारच्या या निर्णयामुळे सर्व दिव्यांगाना आणि ज्येष्ठ नागरिकांना आता त्यांच्या राहत्या घराजवळच कोरोनाची लस उपलब्ध होणार आहे. या गटाची शारीरिक स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन गटांव्यतिरिक्त इतर कोणालाही निअर टू होम कोविड वॅक्सिन सेंटरमध्ये लस मिळणार नाही. इतर सर्व वयोगटातील लोकांचे लसीकरण नेमूण देण्यात आलेल्या ठिकाणीच होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Web Title – दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना जवळच्या केंद्रावर लस ( Vaccinate the disabled and senior citizens at the nearest center )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

विरोधानंतर WhatsApp बॅकफूटवर

Web News Wala

Lockdown अटी होणार शिथिल; मॉल, सिनेमागृह होणार सुरू

Web News Wala

SEBI चा गुंतवणूकदारांना दिलासा, IPO प्रक्रियेसाठी SMS सूचना लागू

Web News Wala

Leave a Reply