Team WebNewsWala
आरोग्य

पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयोगी मेथी

पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयोगी मेथी बदलत्या जीवनशैलीचा परिणाम अनेकांच्या वजनावर झालेला आहे. यात कामाचे स्वरुप आणि आहार हे महत्त्वाचे घटक.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयोगी मेथी

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम अनेकांच्या वजनावर झालेला आहे. यात कामाचे स्वरुप आणि आहार हे महत्त्वाचे घटक ठरत आहेत. वाढलेले वजन ही अनेकांसाठी मोठी समस्या झाली आहे. त्यांच्यासाठी काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वजन कमी करण्यासाठी आरोग्यदायी आहार महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे चुकीचा आहार टाळणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. (Use Methi seeds for lose belly fat)

वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये मेथीच्या दाण्यांचा समावेश

यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. मेथीच्या दाण्यांमध्ये पुष्कळ पौष्टिक गुणधर्म असतात त्यामुळे आपली चरबी कमी होते.

दररोज 10 ग्रॅम मेथीचे सेवन केले, तर शरीरावरची चरबी कमी होण्यास मदत होते. मेथीच्या दाण्यांमध्ये विद्रव्य फायबर आणि ग्लूकोमोनास फायबर असते. ते आतड्यांमधून ग्लूकोज शोषून घेण्यास आणि मधुमेह नियंत्रित करण्याचे कार्य करतात. याव्यतिरिक्त, मेथीमधील अल्कॉइड्समुळे शरीरात इन्सुलिनचे प्रमाण सुधारते आणि ग्लाइसेमिक पातळी कमी होते. यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आहारामध्ये मेथी घेणे गरजेचे आहे.

वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे पाण्यात मेथीची दाणे भिजत घालावे आणि त्यांना 10 ते 15 मिनिटे उकळवावे. यानंतर, चहाप्रमाणेच त्याचे सेवन करावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहील आणि शरीरामधील अतिरिक्त चरबी गायब होते.

पोटाची चरबी घडविण्यासाठी उपयोगी मेथी

मेथीमध्ये आढळणारे पौष्टिक घटक मधुमेहाच्या समस्येसवर गुणकारी ठरतातच, परंतु पचन आणि आम्लपित्ताच्या समस्येस देखील प्रतिबंधित करतात. जर, आपल्यालाही मेथीच्या माध्यमातून या समस्यांपासून आराम मिळवायचा असेल, तर यासाठी दररोज 10 ग्रॅम मेथीचे दाणे गरम पाण्यात भिजवून त्याचे सेवन करावे

मेथीचे दाणे लोह आणि प्रथिने यांचे समृद्ध स्रोत आहेत. हे दोन पोषक तत्व केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. त्यामध्ये प्लाव संयुगाची एक अद्वितीय रचना आहे, ज्यात फ्लेवोनोइड्स आणि सैपोनिन्सचा समावेश आहे. या संयुगाला त्यांच्या अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीफंगल प्रभावांमुळे केसांच्या वाढीस प्रभावशाली असल्याचे मानले जाते.

एकावेळी किती मेथी खावी ? 

अभ्यासानुसार, एका दिवसात 2 ते 25 ग्रॅम मेथीचे सेवन करणे योग्य आणि सुरक्षित आहे. तथापि, त्याचे प्रमाण किती बरोबर आहे, ते सेवन करत असलेल्या व्यक्तीवर अवलंबून असते. तसे, त्याचे एकावेळी जास्तीत जास्त प्रमाण 10 ग्रॅम निश्चित केली गेले आहे. याशिवाय मेथीचे कच्चे दाणे 25 ग्रॅम, पावडर 25 ग्रॅम आणि भिजवलेली मेथी देखील 25 ग्रॅमच योग्य आहे. परंतु, जर तुम्हाला मेथीचे सेवन करायचे असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मेथीचे सेवन केल्यास चयापचय क्रिया, इन्सुलिन आणि ग्लुकोज सुधारण्यास मदत होते. या व्यतिरिक्त, ज्यांना मधुमेह होण्याचा धोका आहे किंवा ज्यांचा कौटुंबिक इतिहास या रोगाशी जोडलेला आहे, त्यांच्यासाठी देखील हे फायदेशीर आहे.

( टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा )

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

देशातील सर्वात महागडी भाजी किंमत प्रति किलो हजारोच्या घरात

Team webnewswala

तुपामुळे वजन वाढते ? तूप खाण्याचे फायदे नक्की वाचा

Web News Wala

कोरोना काळात राज्यांमध्ये गर्भपाताच्या औषधांचा तुटवडा

Team webnewswala

Leave a Reply