आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान

लगेच अपडेट करा Google Chrome, Cert-In ने दिला इशारा

जर तुम्ही Google Chrome ब्राउझर 88.0.4324.146 पेक्षा जुनं व्हर्जन वापरत असाल तर तातडीने अपडेट करण्याचा सल्ला युजर्सना देण्यात आला आहे
Google Chrome वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

विंडोज, मॅक आणि लिनक्स प्लॅटफॉर्मवर Google Chrome ब्राउझरमध्ये अनेक त्रुटी असल्याचं समोर आलं आहे. जर तुम्ही Google Chrome ब्राउझर 88.0.4324.146 पेक्षा जुनं व्हर्जन वापरत असाल तर तातडीने अपडेट करण्याचा सल्ला युजर्सना देण्यात आला आहे.

Google Chrome चं जुनं व्हर्जन तातडीने अपडेट करण्याची सूचना युजर्सना देण्यात आली आहे. सायबर सुरक्षा एजन्सी ‘द कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टिम ऑफ इंडिया’ने (सीईआरटी-इन) युजर्सना तातडीने क्रोम ब्राउझर अपडेट करण्यास सांगितलं आहे.

Google Chrome मध्ये काही त्रुटी असल्याचं निदर्शनास

Google Chrome मध्ये काही त्रुटी असल्याचं निदर्शनास आलं आहे. या त्रुटींवर हल्ला करुन हॅकर्स सिस्टिमचा डेटा बघू शकतात, बदलू शकतात किंवा डिलिटही करु शकतात’, असं सीईआरटी-इनने म्हटलंय.

तर, सुरक्षेशी निगडीत सहा त्रुटींवर नवीन अपडेटमध्ये काम करण्यात आलं असून त्रुटी दूर केल्याचं गुगलकडून सांगण्यात आलं आहे. यासाठी बाहेरच्या रिसर्चर्सची मदत घेण्यात आली असंही गुगलने सांगितलं. दरम्यान,  गुगलने क्रोम 89 बीटा मॉडेल रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. नवीन क्रोम व्हर्जनमध्ये Privacy Sandbox सोबत अनेक नवीन पर्याय असू शकतात.  Chrome 89 मध्ये नवीन टॅप पेजमध्ये Discover Feed ला मोडिफिकेशनसह परत आणलं जाईल. याचं डिझाइनही पहिल्याप्रमाणेच असेल.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

आता पॅच चिकटवून घ्या करोना लस

Web News Wala

व्हिएतनाममध्ये हवेतून कोरोनाचा संसर्ग ? सापडला धोकादायक व्हेरिएंट

Web News Wala

ब्रिटनने Huawei ला केले 5 जी नेटवर्कमधून बाहेर

Team webnewswala

Leave a Reply