Team WebNewsWala
धर्म शहर समाजकारण

Paws Dombivali चा महाशिवरात्री निमित्त अनोखा उपक्रम

Paws Dombivali पॉज संस्थेचा महाशिवरात्री दिनानिमित्त अनोखा उपक्रम... मुक्या जनावरांना दुध पाजत केली महाशिवरात्री साजरी.

पॉज संस्थेचा महाशिवरात्री दिनानिमित्त अनोखा उपक्रम…
मुक्या जनावरांना दुध पाजत केली महाशिवरात्री साजरी

डोंबिवली : Paws Dombivali पॉज संस्था डोंबिवली वतीने दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्र दिनानिमित्त अनोखा उपक्रम राबविला जातो.शिवशंकराच्या पिंडीवर शिवभक्त शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करतात. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मंदिरे बंद असल्याने Paws Dombivali संस्थेचे कार्यकर्ते अभिषेक सिंग, साधना सभरकर, उनिशिया वाझ, पवन भोईटे आणि ग्लेन अलमेडा यांनी भाविकांशी संवाद साधून संस्थेला दुध देण्याची विनंती केली.

संस्थेच्या उपक्रमास नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

८० लिटर दुध संस्थेकडे जमा 

या उपक्रमास नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला असून काही तासात सुमारे ८० लिटर दुध संस्थेकडे जमा झाल्याची माहिती संस्थेचे निलेश भणगे यांनी दिली. वीस लिटर दुध हे साईसेवा वृद्धाश्रमला दिले. भाविकांकडून जमा झालेले दुध एकत्र करून त्यात पाणी मिळवून फिल्टर करून Paws Dombivali संस्था रस्त्यावरील जखमी प्राण्यांना देते. तसेच न फोडलेल्या दुधाच्या पिशव्या हे वृद्धाश्रमात आणि अनाथालयात दिले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पुण्याच्या वाघाटींना मानवली मुंबई, महिनाभरात वजन वाढले दुपटीने

Team webnewswala

राणीची बाग १५ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली होण्याची शक्यता

Web News Wala

महाड दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा हात देणाऱ्या संस्थांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

Team webnewswala

Leave a Reply