Team WebNewsWala
नोकरी

बेरोजगार तरुणांना महावितरणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

बेरोजगार तरुणांना महावितरणमध्ये नोकरीची सुवर्णसंधीचालून आली आहे. महावितरणने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना जारी.
बेरोजगार तरुणांना महावितरणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी 

मुंबई – बेरोजगार तरुणांना महावितरणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी  (MAHADISCOM Recruitment 2021) चालून आली आहे. महावितरणने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना जारी करून विद्युत सहायक आणि उपकेंद्र सहायक पदांवर अर्ज मागवले आहेत. 18 फेब्रुवारी 2021 पासून अर्जांची प्रक्रियाही सुरू झालेली आहे. आज अर्ज करण्याचा अखेरचा दिवस आहे. 12वी पास तरुणही या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेत विद्युत सहायकांच्या एकूण 5000 आणि उपकेंद्र सहायकांच्या एकूण 2000 पदांवर नियुक्त्या होणार आहेत.

महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना जारी

महावितरणने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना जारी करून विद्युत सहायक आणि उपकेंद्र सहायक पदांवर अर्ज मागवले आहेत. 18 फेब्रुवारी 2021 पासून अर्जांची प्रक्रियाही सुरू झालेली आहे. आज अर्ज करण्याचा अखेरचा दिवस आहे. 12वी पास तरुणही या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेत विद्युत सहायकांच्या एकूण 5000 आणि उपकेंद्र सहायकांच्या एकूण 2000 पदांवर नियुक्त्या होणार आहेत.

पदांचा तपशील

एकूण पदे – 7000

विद्युत सहायक एकूण 5000 पदे

सामान्य- 1637 पदे
महिला- 1500 पदे
माजी सैनिक- 750 पदे
शिकाऊ उमेदवार – 500 पदे
खेळाडू – 250 पदे
अनुमानित (प्रोजेक्टेड)- 250 पदे
भूकंपाने प्रभावित- 99 पदे
अनाथ- 14 पदे

डिप्लोमा अभियंत्यांना नोकरीची संधी

उपकेंद्र सहायक एकूण 2000 पदे

सामान्य- 656 पदे
महिला- 600 पदे
माजी सैनिक- 300 पदे
शिकाऊ उमेदवार – 201 पदे
अनुमानित (प्रोजेक्टेड)- 99 पदे
खेळाडू- 98 पदे
भूकंपाने प्रभावित- 40 पदे
अनाथ – 6 पदे

वयोमर्यादा

उमेदवार 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 27 वर्षांपेक्षा कमी वयाचा असला पाहिजे.

शैक्षणिक योग्यता

या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी 12वी उत्तीर्ण असले पाहिजे. यासोबतच सेंटर ऑफ एक्सिलन्स किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून नॅशनल ट्रेड ट्रेनिंग सर्टिफिकेट (एनटीटीसी) किंवा दोन वर्षांचा डिप्लोमा असला पाहिजे.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतींच्या आधारे केली जाईल.

वेतन

निवड झालेल्या उमेदवारांना 18,000 रुपयांपासून ते 27,000 रुपयांपर्यंत वेतन दिले जाऊ शकते.

महत्त्वपूर्ण तारखा

अर्ज नोंदणीस प्रारंभ – 18 फेब्रुवारी 2021
अर्ज नोंदणीची अखेरची तारीख – 30 मार्च 2021

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

शिक्षकांसाठी मोठी बातमी TET Lifetime Validity वैध

Web News Wala

लवकरच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी

Team webnewswala

Disney Layoff थीमपार्कमधील कमर्चाऱ्यांना लॉकडाउन चे चटके

Team webnewswala

Leave a Reply