Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय नोकरी

कोरोनामुळे जगभरात बेरोजगारीचे संकट UN चा इशारा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील १ कोटींहून अधिक लोकं बेरोजगार झाल्याची माहिती. आता संयुक्त राष्ट्र संघाने कोरोनामुळे जगभरात बेरोजगारीचे संकट आणखीन वाढणार

कोरोनामुळे जगभरात बेरोजगारीचे संकट UN चा इशारा

Webnewswala Online Team – कोरोनामुळे कोट्यावधी लोकांचे नुकसान झाले आहे हे सगळ्यांच माहित आहे. काही दिवसांपूर्वी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे (Centre for Monitoring Indian Economy (CMIE)) मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील १ कोटींहून अधिक लोकं बेरोजगार झाल्याची माहिती दिली होती. आता संयुक्त राष्ट्र संघाने कोरोनामुळे जगभरात बेरोजगारीचे संकट आणखीन वाढणार असा इशारा दिला आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने कोरोनामुळे जागतिक स्तरावर ‘बेरोजगारीच्या समस्ये’चा उल्लेख केला आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (International Labor Organization ) बुधवारी एक अहवाल सादर केला. ज्यामध्ये कोरोनामुळे रोजगारावर झालेल्या परिणामाचा तपशीलवार देण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्र संघ म्हणाले की, रोजगार आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सर्व देश मागे पडले आहेत.

कोरोनामुळे जगभरात बेरोजगारीचे संकट UN चा इशारा

पुढील वर्षी देखील असाच परिणाम होईल आणि २० कोटी लोकं बेरोजगार होण्याची शक्यता आहे. आता १०.८ कोटी कामगार गरीब आणि अत्यंत गरीब या कॅटेगरीमध्ये आले आहेत.

जागतिक कोरोना संकटामुळे जगभरात बेरोजगाराची समस्या २०२१ मध्ये ७.५ कोटीपर्यंत पोहोचले आणि २०२२मध्ये २.३ कोटी होईल. रोजगार आणि कामकाज वेळेत कमी झाल्यामुळे बेरोजगारीचे संकट आणखीन गडद होत जाईल. महामारीचे संकट आले नसते तर ३० कोटी नवीन रोजगार २०२०मध्ये उपलब्ध झाले असते.

काय आहे या अहवालामध्ये ?

World Employment and Social Outlook: Trends 2021 report या १६४ पानाच्या अहवालात संयुक्त राष्ट्रच्या कामगार संघटनेच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने म्हटले की, ‘कोरोनामुळे रोजगार बाजारावर असर पडला आहे. धोरणात्मक प्रयत्नांची पूर्तता न झाल्याने महामारीमुळे अभूतपूर्व विनाश केला आहे. याचा परिणाम बऱ्याच वर्षांपर्यंत राहिल. २०२०मध्ये एकूण कामकाजाच्या वेळेमध्ये नुकसान झाल्याचे यला मिळाले, जो ८.८ टक्के आहे. ही वेळ २५.५ कोटी पूर्णवेळ कामगारांच्या एका वर्षासाठी काम करण्याइतकीच आहे.’

Web Title – कोरोनामुळे जगभरात बेरोजगारीचे संकट UN चा इशारा ( UN warns of global unemployment crisis due to corona )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

व्हिएतनाममध्ये हवेतून कोरोनाचा संसर्ग ? सापडला धोकादायक व्हेरिएंट

Web News Wala

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुखही Home Quarantine

Team webnewswala

अखेर ‘राफेल’ चे भारतात ‘हॅप्पी लँडिंग’

Team webnewswala

Leave a Reply