Team WebNewsWala
शिक्षण

BA B.Com साठी CET घेण्याचा विचार सुरू उदय सामंत

राज्यातील पारंपरिक अभ्यासक्रम अर्थात BA B. Com साठी CET घ्यावी का याचा निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली

BA B.Com साठी CET घेण्याचा विचार सुरू उदय सामंत

Webnewswala Online Team – राज्यातील पारंपरिक अभ्यासक्रम अर्थात BA B.Com साठी CET घ्यावी का याचा निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमली असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. या बरोबरच इतर अभ्यासक्रमांसाठी सीईटी जुलै अखेर पर्यंत होऊन सप्टेंबर पर्यंत राज्यातील महाविद्यालये सुरू होतील असे देखील त्यांनी सांगितले.

पुण्यामध्ये सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान शैक्षणिक वर्ष ऑनलाइनच सुरू राहील असे ते म्हणाले.सामंत म्हणाले ” कालच सीईटीच्या लोकांची बैठक झाली. प्रोफेशनल कोर्सेसला सीईटी नेहमी प्रमाणे पार पडेल.. इतर प्रवेशांसाठी वेगळा विचार करावा का याबाबत मतमतांतरं आहेत.. म्हणून बोर्डाचे निकाल आले की निर्णय घेतला जाईल. यासाठी व्हाईस चॅन्सलर्सची समिती नेमून निर्णय घेण्यात येणार आहे.सीईटीची परिक्षा केंद्र दुप्पट करणार आहोत. जुलै पर्यंत परिक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत”

सप्टेंबर मध्ये सगळे कॉलेज सुरु

दरम्यान महाविद्यालये सुरू करण्याबाबत विचारले असता,”जोपर्यंत कोव्हीड आटोक्यात येत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलावणे योग्य होणार नाही.” असं सामंत म्हणाले

महाविद्यालयांच्या शुल्काबाबत निर्णय घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.जितके दिवस कॉलेज बंद आहे त्यासाठी एफआरए समितीची मुदत संपली आहे.त्यासाठीची समिती नेमण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे फाईल. ती मंजूर झाली की तातडीने बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या महाविद्यालयांच्या फी बाबत तक्रारी येतील त्यांच्यावर एफआयआर देखील दाखल करण्याच्या सुचना दिली असल्याचंही ते म्हणाले.शुल्क नियंत्रण समिती खासगी विद्यापीठांसाठी देखील करावी या मताचा मी देखील आहे असा दावा सामंत यांनी केला.

“सप्टेंबर मध्ये सगळे कॉलेज सुरु करण्याच्या मनस्थितीत आहोत.उच्च आणि तंत्रशिक्षणासाठी प्लॅन तयार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Web Title – BA B.Com साठी CET घेण्याचा विचार सुरू उदय सामंत ( Uday Samant started thinking of taking CET for BA B. Com )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात अडचणी

Team webnewswala

देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी ग्रेस फाउंडेशन कडुन टॅब

Team webnewswala

6 जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा होणार शिवस्वराज्य दिन

Web News Wala

Leave a Reply