Team WebNewsWala
तंत्रज्ञान राष्ट्रीय

Twitter ला टक्कर देणार स्वदेशी Tooter

Twitter ला टक्कर देण्यासाठी स्वदेशी Tooter सज्ज झालं आहे. मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईटवर Tooter बाबात युझर्सची निरनिराळी मतं पाहायला मिळत आहेत.

Twitter ला टक्कर देण्यासाठी स्वदेशी Tooter सज्ज झालं आहे. मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईटवर Tooter बाबात युझर्सची निरनिराळी मतं पाहायला मिळत आहेत. काही युझर्सनं Tooter हे ट्विटरची कॉपी असल्यातं म्बचलं आहे. तर काही युझर्सनं हे अॅप स्वदेशी असल्याचं सांगत त्यावर खातं उघडण्याचा सल्लाही दिला आहे. Tooter ची कलर स्कीम आणि स्टाईलदेखील ट्विटरप्रमाणेच आहे.

Tooter नं हे अॅप भारतातच तयार केल्याचा दावा केला आहे. “भारताचं स्वत:चं असं स्वदेशी सोशल नेटवर्क असावं असं आम्हाला वाटतं. याशिवाय आम्ही अमेरिकन ट्विटर इंडियाचे डिजिटल कॉलोनी आहोत. ही ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा वेगळी नाही. Tooter आमचं स्वदेशी आंदोलन २.० आहे.” असं Tooter ने आपल्या अबाऊट सेक्शनमध्ये नमूद केलं आहे.

Tooter प्रमोट करून पैसे कमवण्याची संधी

Tooter Pvt. Ltd. चे नंदा हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांचं देखील ट्विटरवर खातं आहे. Tooter च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या बायोमध्ये आपला ईमेल आयडीदेखील दिला आहे. प्रमोट करण्यासाठी त्या ईमेल आयडीवर संपर्क करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. Tooter वेबसाईटनुसार हा प्लॅटफॉर्म ओपन सोर्स आहे आणि Mastodon प्रोजेक्टकडून इन्स्पायर्ड असल्याचं म्हटलं जात आहे.

जर कोणत्याही ट्विटर युझरचे फॉलोअर्स ५ हजार पेक्षा जास्त असतील त्यांना Tooter प्रमोट करून पैसे कमवण्याची संधी मिळणार आहे

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

सीमाभाग महाराष्ट्राचाच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला पुरावा

Web News Wala

अग्रणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला राष्ट्रीय जल पुरस्कार

Team webnewswala

आता घरबसल्या Watsapp वर ऑनलाईन करा गॅस बुकिंग

Team webnewswala

Leave a Reply