Team WebNewsWala
Other

या होळीला पुरणपोळी चे 8 प्रकार नक्की करा ट्राय

होळी आणि रंगपंचमी हा अनेकांच्या आवडीचा सण आहे. या दिवशी होळीला पुरणपोळी चा नैवेद्य दाखवला जातो. पुरणपोळी करणं हे वाटतं तितकं सोपं नाही
या होळीला पुरणपोळी चे 8 प्रकार नक्की करा ट्राय

होळी आणि रंगपंचमी हा अनेकांच्या आवडीचा सण आहे. त्यामुळे या दिवशी खास होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. पुरणपोळी करणं हे वाटतं तितकं सोपं नाही. ती करण्यासाठी मोठा खटाटोप करावा लागतो. त्यामुळे अनेक गृहिणी ही पोळी करण्याचं टाळतात. परंतु, होळीच्या दिवशी नैवेद्यासाठी तरी ही पोळी करावीच लागते. कारण, पुरणपोळीशिवाय हा सण अपूर्ण आहे. महाराष्ट्रात जवळपास ८ ते १० वेगवेगळ्या पद्धतीने ही पोळी करता येते. त्यामुळेच आज आपण झटपट आणि कोणताही पसारा न करता पोळी कशी तयार करायची हे पाहुयात.

पुरणपोळीचे आठ भन्नाट प्रकार कोणते ते देखील जाणून घेऊयात

कणकेची पुरणपोळी

अगदी पूर्वीपासून कणकेच्या पीठापासून पुरणपोळी तयार करण्यात येते.

हरभरा डाळ आणि गुण याचं सारण करुन ते कणकेच्या पीठात भरलं जातं आणि हलक्या हाताने ही पोळी लाटली जाते. ही अस्सल पारंपरिक पुरणपोळी करणं अत्यंत कठीण आहे. कारण, बऱ्याच वेळा पोळी लाटत असताना ती फुटते आणि त्यातील पुरण बाहेर पडतं. त्यामुळेच याला पर्याय म्हणून अनेक गृहिणी कणकेऐवजी मैदाचा वापर करतात.

साखर गुळाची पुरणपोळी –

काही जणांना गुळाची पोळी आवडत नाही. अशावेळी साखर आणि गुळ समप्रमाणात घेऊन त्याचं सारण तयार करता येऊ शकतं.

फक्त साखरेची पुरणपोळी –

ज्यांना गुळाची पोळी अजिबात आवडत नाही अशांसाठी साखरेपासून तयार केलेली पोळी करता येऊ शकते. यात गुळाऐवजी साखरेचा वापर करावा. सोबतच किंचितशी हळद मिक्स करावी. त्यामुळे पोळीला एक पिवळसर रंग येतो.

खापर पुरणपोळी –

खानदेशातील फेमस प्रकार म्हणजे खापर पुरणपोळी. ही पोळी विशिष्ट आणि पारंपरिक पद्धतीने तयार केली जाते. ही पोळी खास मातीच्या खापराव केली जाते.

सत्तूची पुरणपोळी –

ज्या लोकांना पुरणपोळी खाण्याची इच्छा असते. मात्र, डाएट आडवं येतं अशा लोकांनी सत्तूची पोळी ट्राय करावी. या पोळीमध्ये पोषकतत्व भरपूर असून त्यामुळे वजनदेखील वाढत नाही.

मूगडाळ पुरणपोळी –

मूगाची डाळ पचायला हलकी असते. त्यामुळे अनेक जण मूगाच्या डाळीपासून पुरणाची पोळी तयार करतात.

इन्संट पुरणपोळी –

आजकाल बाजारात इन्स्टंट पुरणपोळी रेडिमिक्स मिळतं. हे रे़डिमिक्स घरी आणून त्यात गरजेप्रमाणे पाणी घाला आणि त्याच सारण करुन ते पोळीत भरा.

ड्रायफ्रूट्स पुरणपोळी –

ज्यांना ड्रायफ्रूट्स खाण्याची आवड आहे त्यांनी सुकामेव्याची पूड तयार करुन ती पुरणाच्या सारणात टाकावी आणि त्यापासून पुरणपोळी तयार करावी.

(टीप : कोणत्याही उपायांचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

जिओचे मोठे गिफ्ट करा जिओ फोन मधून यूपीआय पेमेंट

Team webnewswala

मराठी प्रेक्षकांनाच मराठी चित्रपट पाहायचे नाहीत महेश मांजरेकर

Team webnewswala

राज्यसभेमध्ये बँक नियमन विधेयक मंजूर

Team webnewswala

Leave a Reply