Team WebNewsWala
Other व्यापार शहर समाजकारण

करोनाकाळात वृत्तपत्रांच्या रद्दीला तिप्पट भाव

वेबन्युजवाला हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर, 'न्युज चॅनेल' आहे. या द्वारे मुंबई, महाराष्ट्र, देश तसेच जगभरातील ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे., ताज्या बातम्या, शहर, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राजकारण, समाजकारण, पर्यावरण, अर्थकारण, व्यापार, तंत्रज्ञान, ऑटो, शिक्षण, नोकरी, आरोग्य, पोटोबा, धर्म, राशिभविष्य, मनोरंजन, सिनेमा, नाटक, इतर, हास्य, थोडक्यात, क्रीडा, क्राईम, या विभागातील ताज्या बातम्या आणि मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा वेबन्युजवाला चा कटाक्ष आहे.‘Webnewswala’ is digital content provider framework in regional Marathi language. ‘Webnewswala’ provides online latest Marathi news, Breaking news and positive articles. As an online Marathi news channel ‘Webnewswala’ believes that there is a greater need to create a content, which can be utilized to the full potential of digital medium for Marathi news readers. ‘Webnewswala’ is leading online Marathi news paper is looking to provide digital content in Marathi.
खर्च वाढल्याने दुकानदार हवालदिल; ३५ ते ४० रुपये किलो दर

पालघर : करोनाकाळात व्यवसाय-उद्योगधंद्यांचे अर्थचक्र थांबल्यानंतर वृत्तपत्र छपाई आणि वितरणावरही त्याचा परिणाम झाला. त्यामुळे रद्दीच्या उपलब्धता कमी झाली. त्यामुळे टाळेबंदीच्या आधी दहा ते १२ रुपये प्रतिकिलो रुपयांना मिळणाऱ्या रद्दीचा करोनाकाळात वृत्तपत्रांच्या रद्दीला तिप्पट भाव त्यामुळे ३५ ते ४० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे दुकानदार हवालदिल झाले आहेत.

किराणा माल, बेकरी उत्पादने, फरसाण आणि खाद्यपदार्थापासून औषधे आणि इतर वस्तू बांधण्यासाठी रद्दीत आलेल्या कागदाचा वापर होत असतो. प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर शासनाने र्निबध आल्यानंतर रद्दीच्या वापराला अधिक चालना मिळाली आणि परिणामी न वाचलेल्या वृत्तपत्राच्या रद्दीचा दर दहा ते १५ रुपये प्रतिकिलो असा झाला होता. रद्दीत इंग्रजी वृत्तपत्रांच्या रद्दीला तसेच परदेशी मासिकांच्या गुळगुळीत पेपरला विशेष मागणी असते.

करोनाकाळात अनेक वृत्तपत्रांची वितरण व्यवस्था बंद पडल्याने छपाई बंद केली, त्यानंतरच्या काळात छपाई मर्यादित ठेवण्यात आली. कालांतराने वृत्तपत्रांची छपाई सुरू झाली तरी वृत्तपत्र खरेदी करणारे वा घरपोच वृत्तपत्राची मागणी करणाऱ्या व्यक्तींची संख्या तुलनात्मक कमी राहिली. टाळेबंदी सुरू असल्याने घरामध्ये साचलेले रद्दी पेपर विक्रीस काढण्यास  नागरिक निरुत्साही दिसतात. परिणामी मुंबई व उपनगरात उपलब्ध होणारी रद्दी पेपर आवक कमी झाल्याने करोनाकाळात वृत्तपत्रांच्या रद्दीला तिप्पट भाव या पेपरचे दर ३५ ते ४० रुपये किलो झाल्याने रद्दी पेपरचे किरकोळ बाजारात दर वाढल्याचे दिसून येत आहे.

कागदी पिशव्यांना प्राधान्य

रद्दी पेपरचे दर वाढले असताना ब्राउन पेपर किंवा बटर पेपरच्या पिशव्या ८० ते १२० रुपये किलो इतक्या दराने मिळत असल्याने अनेक दुकानदार कागदी पिशव्यांचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र या पिशव्या एका विशिष्ट आकारातच उपलब्ध होत असल्याने अनेक दुकानदारांना विविध आकारांच्या वृत्तपत्राच्या रद्दीची गरज अजूनही भासत असते. रद्दी पेपरची उपलब्धता कमी असल्याने अनेक  दुकानदारांनी पातळ व कमी मायक्रोनच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. अशा प्लास्टिक पिशव्यांमध्ये बांधून नंतर वस्तू कापडी किंवा इतर पिशव्यांमध्ये भरण्याचे प्रकार अनेक दुकानदार करत आहेत. एकीकडे वृत्तपत्र वितरणावर परिणाम झाला असल्याने रद्दी पेपरच्या उपलब्धतेवर परिणाम झाल्याने वेगवेगळ्या दुकानदारांना इतर पर्यायांचा शोध घेणे गरजेचे पडत आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

बुलेटला टक्कर देण्यासाठी बजाज Neuron ने कसली कंबर

Team webnewswala

हनुमान जयंती साठी राज्यशासनाकडून मार्गदर्शक सुचना जाहीर

Web News Wala

EMI Moratorium वर तारीख पे तारिख

Team webnewswala

Leave a Reply