Team WebNewsWala
Other पर्यावरण

वनाधिकार अधिनियमातील बदलांचा आदिवासींना फायदा

वनाधिकार अधिनियमातील बदलांचा आदिवासींना फायदा वनक्षेत्रात घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबतची अधिसूचना राज्यपालांनी केली जारी 

वनाधिकार अधिनियमातील बदलांचा आदिवासींना फायदा वनक्षेत्रात घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबतची अधिसूचना राज्यपालांनी केली जारी 

वाडा :  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वनाधिकार अधिनियम २००६ मध्ये महत्त्वाचा बदल केल्याने आदिवासी क्षेत्रात कसत असलेल्या वनपट्टेधारकांना विशेषत: अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी कुटुंबांना वनक्षेत्रात घरे बांधता येणार आहेत. वनक्षेत्रात घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबतची अधिसूचना राज्यपालांनी जारी केली आहे. याचा फायदा पालघर जिल्ह्यतील हजारो वनपट्टेधारकांना होणार आहे.

कच्ची झोपडी बांधून राहात असलेल्या आदिवासींना दिलासा

गेल्या अनेक वर्षांपासून श्रमजीवी संघटनेने ही मागणी लावून धरली होती. राज्यपालांनी याबाबतची २३ सप्टेंबर रोजी अधिसूचना काढली असल्याचे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी एका पत्रकाद्वारे माहिती दिली. या अधिसूचनेमुळे अनुसूचित क्षेत्रात वनपट्टय़ाच्या जागेवर कच्ची झोपडी बांधून राहात असलेल्या आदिवासींना दिलासा मिळाला आहे. वनपट्टय़ाच्या जागेवर त्यांना पक्के घर बांधता येणार असल्याने आदिवासींमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

घर बांधण्यास परवानगी न देणारा हा कठोर नियम बदलला जाणार

राज्यपालांच्या या अधिसूचनेमुळे वर्षांनुवर्षे घर बांधण्यास परवानगी न देणारा हा कठोर नियम बदलला जाणार आहे. ज्या कठोर नियमामुळे घरासारख्या मूलभूत हक्कापासून आदिवासी वर्षांनुवर्षे वंचित राहिला होता तो हक्क त्याला राज्यपालांच्या या अधिसूचनेमुळे  प्राप्त झाला आहे. वनाधिकार अधिनियमातील बदलांचा आदिवासींना फायदा झाला असल्याचे श्रमजीवी संघटनेने विवेक पंडित यांनी सांगितले. श्रमजीवी संघटनेने चालवलेला लढा खऱ्या अर्थाने सफल झाला असल्याचे विवेक पंडित यांनी सांगितले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

जिओचे मोठे गिफ्ट करा जिओ फोन मधून यूपीआय पेमेंट

Team webnewswala

खासदार रविकिशन यांना आता Y + Security

Team webnewswala

पवई IIT चा ‘बोधीट्री’ आता सर्वांना उपलब्ध

Team webnewswala

Leave a Reply