आंतरराष्ट्रीय इतर समाजकारण

Statue of Unity ला अमेरिकेच्या Statue of Liberty पेक्षा जास्त पसंती

जगातील सर्वाधिक उंचीच्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यामुळे चर्चेत आलेले गुजराथचे केवडिया शहर पूर्णपणे ई वाहन शहर बनविले जात असून अशी व्यवस्था असलेले पहिलेच शहर

गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘Statue of Unity’ ने पर्यटकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं असून अमेरिकेतील ‘Statue of Liberty’ पेक्षाही अधिक पर्यटकांना आकर्षित करत आहे. यामुळे, ‘Statue of Unity’ असलेलं केवडिया हे ठिकाण आंतरराष्ट्रीय दर्जाचं फॅमिली हॉलिडे डेस्टिनेशन बनत चालले आहे”, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शहर पर्यावरणीय आणि स्थानिक वारसा जपत संपूर्ण कुटुंबासाठी उत्तम पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात आलं आहे. सुरुवातीपासूनच संपूर्ण कुटुंबासाठी हे ठिकाण एक आदर्श पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची पंतप्रधानांची दृष्टी होती”, असं गुजरातचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव गुप्ता वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना म्हणाले.

शहराचं सर्वात मोठं आकर्षणाचं केंद्र म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी असून अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही जास्त पर्यटकांना आकर्षित करत आहे “,

गुजरातचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव गुप्ता

लॉकडाउनपूर्वी दररोज 13,000 पर्यटकां स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट

दरम्यान, करोना विषाणूचा संसर्ग येण्याआधी म्हणजे लॉकडाउनपूर्वी दररोज 13,000 पर्यटक स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट द्यायचे, तर गेल्या महिन्यात प्रशासनाने लॉकडाउनमध्ये थोडी शिथिलता दिल्यानंतर सुमारे 10 हजार पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे. राजीव गुप्ता यांनी सांगितले की, सुमारे 3,000 आदिवासी मुला-मुलींनी थेट रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. याशिवाय 10,000 लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. तर, “इथे असलेल्या चिल्ड्रन न्यूट्रिशन पार्क, आरोग्य व्हॅन, कॅम्पिंग आणि रिव्हर राफ्टिंगसारख्या अशा विविध आकर्षणाच्या गोष्टींमुळे हे ठिकाण कुटुंबियांसाठी सुट्टीचे एक महत्वाचे केंद्र बनत चालले आहे. घरातील प्रत्येकासाठी इथे काहीना काही आकर्षक आहे”, असं गुजरातच्या पर्यटन सचिव ममता वर्मा यांनी म्हटलं.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

बुलेटप्रूफ गाडीला रामराम नितीन गडकरी वापरणार इलेक्ट्रिक कार

Web News Wala

१ ऑक्टोबरपासून नवे बदल होणार गॅस सिलेंडरपासून आरोग्य विम्यापर्यंत

Team webnewswala

शाहरुख खान च्या Knight Riders ची आता हॉलीवूडमध्ये एंट्री

Team webnewswala

Leave a Reply