Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान

भारतीय नियमांचं पालन करत TikTok चे भारतात Comeback

बंदी असलेल्या या अॅपने नवीन सोशल मीडिया कायदे आणि भारीय सूचनांचं पालन काटेकोरपणे केलं असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे TikTok चे भारतात Comeback करणार का ?

भारतीय नियमांचं पालन करत TikTok चे भारतात Comeback 

Webnewswala Online Team – देशभरात केंद्र सरकारने TikTok या मोबाईल अॅप्लिकेशनवर पूर्णपणे बंदी घातली होती. पण भारतात बंदी असलेल्या या अॅपने नवीन सोशल मीडिया कायदे आणि भारतीय मार्गदर्शक सूचनांचं पालन काटेकोरपणे केलं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे TikTok चे भारतात Comeback करणार का ? असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे.

शॉर्ट व्हिडीओद्वारे अनेक लोक TikTok या अॅप्लिकेशनवर प्रकाश झोतात आले व मोठे सेलिब्रिटी देखील बनले. भारतामध्ये परतण्यासाठी कंपनी यथोचित प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. त्यानुसारच केंद्र सरकारच्या नव्या नियमांचं पालन कंपनी काटेकोरपणे करत असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी या संदर्भात बोलताना सांगितलं की, टिकटॉकवरील बंदी हा पूर्णतः हा वेगळा मुद्दा आहे आणि सोशल मीडिया नियम पाळणे वेगळा त्यामुळे टिक टाॅक हे अॅप भारतात पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली.

TikTok या कंपनीला भारतात पुन्हा एकदा परतण्यासाठी आशा आहे. तसेच त्यांनी केंद्र सरकारला यासंदर्भात पत्र पाठवून आम्ही सर्व नियमांचं पालन करू, असं वचन देखील दिलं आहे. परंतु, केंद्र सरकार यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेईल, असं चित्र सध्या पाहायला मिळत नाही. त्यामुळे तूर्तास तरी TikTok  वरील बंदी भारतात कायम राहणार असल्याचं दिसून येत आहे.

Web Title – भारतीय नियमांचं पालन करत TikTok चे भारतात Comeback ( TikTok’s comeback in India following Indian rules )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

पाकिस्तानचा चीनला मोठा झटका चीनच्या अ‍ॅपवर घातली बंदी

Team webnewswala

आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा दबदबा

Team webnewswala

Task Mate App टास्क पूर्ण करुन कमवा पैसे

Team webnewswala

Leave a Reply