Team WebNewsWala
Other क्राईम शहर

टिक टॉक वरील बंदीमुळे स्टार करताहेत बाईक चोरी

Ticktock Star Arrested For Stealing Two Wheeler For Fun

पुणे मौज मजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या टिक-टॉक स्टार आणि त्याच्या मित्राला गुन्हे शाखा युनिट १ च्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण जवळपास चार लाख रुपयांच्या १० दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

राहुल मोहन पवार वय-१९ असे टिक-टॉक स्टारचे नाव असून त्याचा मित्र स्वप्नील राजू काटकर वर- १९ अशी दुचाकी चोरण्यामध्ये सहभागी असलेल्या आरोपी मित्राचे नाव आहे.

हे दोघे खडकी, सांगवी आणि भोसरी एमआयडीसी परिसरात उभ्या केलेल्या दुचाकी चोरत होते. दिवसभर दुचाकीवर फिरून मौज मजा करून झाल्यानंतर दुचाकी भोसरी येथील पुलाखाली उभी करत असे, असं पोलिसांना त्यांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिक-टॉक स्टार राहुल हा स्वप्ननीलसह भोसरी येथील मुख्य पुलाखाली दुचाकी घेऊन थांबल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस कर्मचारी गणेश सावंत आणि नितीन खेसे यांना मिळाली.

नक्की वाचा >>
देशातील पहिली किसान रेल्वे, शेतकऱ्यांना होणार फायदा
डोंगरी-माझगाव ला जोडणाऱ्या हॅकॉक पुलाच काम अंतिम टप्यात
मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या

त्यानुसार संबंधित ठिकाणी पथकातील इतर कर्मचाऱ्यांसह सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. दोघांकडे मिळालेल्या दुचाकी चोरीच्या असल्याचं पोलीस तपासात समोर आल्यानंतर अधिक चौकशी केली असता त्यांनी दहा दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

खडकी, सांगवी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील ८ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. टिकटॉक स्टार राहुल पवार हा व्हिडीओ करता वेगवेगळ्या दुचाकी वापरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, काळूराम लांडगे यांच्यासह सचिन उगले, गणेश सावंत, रवींद्र गावडे, विजय मोरे, विशाल भोईर, नितीन खेसे यांच्या पथकाने केली आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव ?

Web News Wala

23 August 2020 दैनिक राशी भविष्य Daily Horoscope

Team webnewswala

राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा MPSC चा निर्णय

Team webnewswala

Leave a Reply