Team WebNewsWala
Other

‘तिचं अस्तित्व’ शाँर्टफिल्मच सभापती ललिता पाटील यांच्या हस्ते अनावरण

भिवंडी - स्त्रीला तिचं अस्तित्व स्वतःच दाखवायला पाहिजे. एकविसाव्या शतकात वावरणा-या स्त्रीने स्वतःचं अस्तित्व स्वतःच सिद्ध कराव.
‘तिचं अस्तित्व’ शाँर्ट फिल्मच सभापती ललिता पाटील यांच्या हस्ते अनावरण
भिवंडी – स्त्रीला तिचं अस्तित्व’ स्वतःच दाखवायला पाहिजे. एकविसाव्या शतकात वावरणा-या स्त्रीने इतर कोणावरही अवलंबून न राहता स्वतःचं अस्तित्व स्वतःच सिद्ध कराव. जागतिक महिला दिन साजरा करताना स्वतः महिलांनी आपण सबळ झालेलो आहोत हे दाखवून रोजच साजरा. असे वक्तव्य भिवंडी पंचायत समितीच्या सभापती ललिता प्रताप पाटील यांनी तिचं अस्तित्व या लघुचित्रपटाच्या अनावरण प्रसंगी काढले.

सभापती ललिता पाटील यांच्या हस्ते अनावरण

तिचं अस्तित्व या शाँर्ट फिल्मच्या उद्घाटन प्रसंगी भिवंडी पंचायत समितीच्या सभापती ललिता प्रताप पाटील, गटविकास अधिकारी डॉ. प्रदिप घोरपडे, गटनेते पंचायत समिती सदस्य गुरुनाथ जाधव,भानूदास पाटील, यशवंत भोईर, गटशिक्षणाधिकारी नीलम पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी संजय अस्वले, संजय थोरात, केंद्रप्रमुख जयश्री सोरटे, प्रिया पाटील, संघटनेचे नेते महेंद्र पाटील, धीरज भोईर, नंदू नाईक, ज्योती धुमाळ तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

तिचं अस्तित्व या लघुपटाचे लेखन- दिग्दर्शन अजय लिंबाजी पाटील शाळा राहनाळ यांनी केले आहे. छायाचित्रण साईश गोठिवरेकर, एडिटिंग वल्लभ केणे. या लघुपटात कलाकार म्हणून हर्षा बडगुजर, शारदा चौधरी, अजिता पाटील, अजय पाटील, बालकलाकार अदित्य सोनार, निशा चव्हाण आणि अंजली निकम यांनी अभिनयाची छाप सोडली आहे.

लघुपट लक्ष्मी चित्र या यूट्यूब चँनलवर प्रकाशित

महिला सतत स्वतःचे अस्तित्व नाकारत असतात, त्या नेहमी इतरांवर अवलंबून असतात, निर्णय क्षमतेत पुरुषांना पुढे करून स्वतः मात्र मागे राहतात, एकविसाव्या शतकात हे अत्यंत चुकीचं आहे. महिलांनी सबल झाले पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी स्वतः सिद्ध करावे. या लघुपटात महिला स्वतःचं अस्तित्व नाकारत असताना एक लहान मुलगी मात्र स्वतःचं अस्तित्व सिद्ध करत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रवींद्र तरे यांनी केले. एक सकारात्मक संदेश देणारा हा
लघुपट लक्ष्मी चित्र या यूट्यूब चँनलवर प्रकाशित करण्यात आला आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.comआमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

महाराष्ट्राचा राम साकारणार अयोध्येतील रामाची मुर्ती

Team webnewswala

मुंबईतील 14 हजार 500 इमारतींबाबत सरकारचा निर्णय

Team webnewswala

मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले संबोधित केल्या अनेक घोषणा

Team webnewswala

Leave a Reply