धर्म शहर

कोरोना संकटामुळे प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रा रद्द

आंगणेवाडी तील भराडी देवीची यंदा ६ मार्च रोजीची नियोजित यात्रा करोनामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली

दरवर्षीप्रमाणे उत्सवातील सर्व पारंपारिक धार्मिक विधी व कार्यक्रम होतील, यात्रेकरूंना त्यास हजर राहता येणार नाही.

मुंबई : कोरोना संकटामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी यात्रा रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले.
प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रा रद्द. एस टी महामंडळ यात्रेसाठी विशेष बसची व्यवस्था करणार नाही.

कोरोना संकटामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी यात्रा रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले. आंगणेवाडीची यात्रा २०२१ या वर्षात होणार नाही, असे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. यात्रेच्या निमित्ताने दोन दिवसांसाठी तळकोकणातील बहुसंख्य नागरिक गावी येतात. अनेक विवाहीत महिला देवीच्या दर्शनासाठी माहेरी येतात. पण यंदा यात्रा होणार नसल्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास प्रवास टाळावा आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले. (anganewadi yatra cancelled)

कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आंगणेवाडीवासीयांनी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. आंगणेवाडी यात्रा रद्द झाल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली त्यावेळी आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

आंगणेवाडी यात्रा नसल्यामुळे स्थानिकांचे आर्थिक नुकसान

दरवर्षी किमान सहा ते सात लाख भाविक आंगणेवाडीच्या यात्रेला हजेरी लावतात. यात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातून आंगणेवाडीला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबईतील गिरगाव आणि गिरणगाव या दोन्ही पट्ट्यातून मोठ्या संख्येने नागरिक आंगणेवाडीच्या यात्रेला जातात.

यंदा ६ मार्च रोजी आंगणेवाडीची यात्रा आहे. मात्र कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून आंगणेवाडीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. आंगणेवाडीतील नागरिक कोविड प्रोटोकॉलचे पालन करत आहेत. नागरिकांनी मागील वर्षभरात सर्व सण घरातच साजरे केले. मोठा उत्सव करणे टाळले. आंगणेवाडीतील हा आदर्श कायम कोरोना प्रसाराचे संकट टाळण्यासाठी ६ मार्च रोजी असलेली आंगणेवाडीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय परस्पर सहमतीने घेतला आहे.

करोनाचे संकट अजून संपलेले नाही. गेल्यावर्षी आंगणेवाडी यात्रेला तब्बल आठ लाख भाविकांनी गर्दी केली होती, असे आंगणे यांनी सांगितले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

सोमवारपासून मुंबई मेट्रो सुरु, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Team webnewswala

उत्तराखंड प्रमाणे हैद्राबादमध्ये बद्रीनाथ धाम

Team webnewswala

नव्या वर्षात नवी मुंबईकरांना मेट्रो प्रवासाची भेट

Web News Wala

Leave a Reply