राष्ट्रीय व्यापार

कोरोना काळात ही गौतम अदानी यांची बक्कळ कमाई

अदानी ग्रुपचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी आशियातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. चीनचे झोग शोनशोन यांना मागे टाकत दुसरे स्थान

कोरोना काळात ही गौतम अदानी यांची बक्कळ कमाई 

Webnewswala Online Team – अदानी ग्रुपचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी आशियातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यांनी चीनचे झोग शोनशोन यांना मागे टाकत दुसरे स्थान पटकवल्याचे ‘ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्स’ने म्हटले आहे. सध्या त्यांची एकूण संपत्ती 5.3 लाख कोटी रुपये आहे.

प्रत्येक तासाला 75 कोटी रुपयांची छप्पर फाड के कमाई

कोरोना महामारी असतानाही जानेवारीपासून अदानींची प्रत्येक तासाला तब्बल 75 कोटी रुपयांची कमाई होत असल्याचेही स्पष्ट केले आहे. गौतम अदानी यांनी 42 वर्षांपूर्वी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली होती. चार दशकांपासून त्यांच्या प्रगतीचा आलेख चढताच आहे.

मागील वर्षी 64.89 हजार कोटी रुपयांचे नेटवर्थ होते. त्यामध्ये झपाटय़ाने वाढ होत असून 2021 मध्ये अवघ्या 142 दिवसांत 2.56 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. शेअर बाजारात त्यांच्या सहा कंपन्या लिस्टेड असून 2020 मध्ये त्यांचे शेअर मूल्य 1.45 लाख कोटी रुपये होते. त्यामध्ये सहा पटीने वाढ होऊन ते आता 8.37 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे.

Web Title – कोरोना काळात ही गौतम अदानी यांची बक्कळ कमाई ( This was Gautam Adani’s fortune during the Corona period )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

CBI अधिकाऱ्यांच्या जीन्स, टी शर्ट, स्पोर्ट शूजवर बंदी

Web News Wala

जगातील सर्वात मोठी विमानवाहू युध्दनौका INS विराट 100 कोटीस विकण्यास तयार

Team webnewswala

सरकारचा पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचा निर्णय

Web News Wala

Leave a Reply