Team WebNewsWala
पर्यावरण व्यापार

कारखान्याला ऊस न विकता हा कमावतोय लाखो रुपये

अकोई साहिब येथील गुरमीत सिंग यांनी गत 5 वर्षांपासून साखर कारखान्यांना आपला ऊस विकलाच नाही. त्यांनी आपली एक वेगळी वाट निवडली.

अकोई साहिब येथील गुरमीत सिंग यांनी गत 5 वर्षांपासून साखर कारखान्यांना आपला ऊस विकलाच नाही. त्यांनी आपली एक वेगळी वाट निवडली. याच क्षेत्रातील गाव धुरी क्षेत्रात गतवर्षी ऊस उत्पादकांना साखर कारखान्यांनी अद्यापही पैसे दिले नाहीत म्हणून उत्पादक वर्ग त्रस्त आहेत. उत्पादकांचे जे पैसे थकविण्यात आले आहे. त्याची किंमत सुमारे 20 कोटी रुपये आहे.

इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत दहा पट कमाई

अकोई साहिब येथील गुरमीत सिंग यांनी आपली एक वेगळी वाट निवडली. त्यांनी उसाद्वारे मेडिसीनल म्हणजे औषधीयुक्त काढा बनविणे सुरू केले. आता ते इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत दहा पट कमाई करीत आहेत.

गुरमीत यांनी सांगितले की, ते अनेक वर्षांपासून उसाची लागवड करीत आहेत. पूर्वी ऊस मिलमध्ये विकल्या जात होता. परंतु, योग्य किंमत मिळत नव्हती. किंमत मिळाली तर पेमेंट उशिरा केले जात होते. यामुळे ते त्रासले होते. त्यांचे वडील सोहन सिंह घरीच मातीच्या माठात उसाचा रस टाकून अनेक महिन्यापर्यंत तसाच ठेवत होते. ज्यात काही इतर साहित्य टाकून ते काढा तयार करीत होते. या दिशेत पाऊल टाकत त्यांनी पंजाब कृषी विद्यापीठ (पीएयू) मधून 2015 मध्ये प्रशिक्षण घेतले आणि हे काम सुरू केले. हा प्रयत्न एवढा यशस्वी झाला की, ते आता 11 प्रकारचा काढा तयार करतात. तसेच पंजाब, दिल्ली व हरयाणासह इतर राज्यांत याला विकतात.

एक क्विंटल उसाद्वारे 30 ते 40 बॉटल काढा

एक क्विंटल ऊस साखर कारखान्यांना विकल्यास 310 रुपये मिळतात. यात लेबर व वाहतुकीचा खर्च काढला तर केवळ 200-250 रुपयेच वाचत होते. तसेच एक क्विंटल उसाद्वारे 30 ते 40 बॉटल काढा तयार होतो. एक बॉटल 100 रुपयांना विकली जाते. लेबर, वाहतुकीचा खर्च, मशिनरी व पॅकिंग आदींचा खर्च काढून 2000 ते 2500 रुपये वाचतात. गुरमीत सिंह हे केवळ औषधीयुक्त काढाच बनवित नाही तर लोकांना निरोगीही करीत आहेत.

11 प्रकारचा औषधी काढा

गुरमीत सिंह यांनी सांगितले की, सहसा लोक काढ्याचा उपयोग आजारांवेळी करतात. हा 11 प्रकारचा काढा खाद्यपदार्थांमध्ये उपयोग करण्यासह सांधेदुखी, मधुमेह, पोटाचे आजार, युरिक अॅसिड, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब बरा करण्यातही फायदेशीर आहे. गुरमीत जांभूळ, अॅलोविरा, पुदीना व मेथी, ऊस, सफरचंद, बीट, गिलोय, हळद, लसूण यापासून काढा तयार करतात. सफरचंद सोडून इतर सर्व वस्तू ते स्वत:च उगवितात.

हा काढा जैविक पद्धतीने बनविला जातो. यात कुठल्याही केमिकलचा उपयोग केला जात नाही. वैद्यचा कोर्स करणारे गुरमीत सिंह यांनी आपला अनुभव व अभ्यासाच्या आधारावर लोकांना वेगवेगळ्या आजारांपासून बचावासाठी काढ्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. या काढ्यामुळे अनेक लोकांचा आजार बरा झाला आहे. यासाठी त्यांना पीएयूच्या वतीने 2019 मध्ये विशेष पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे.

वर्षभरात होतो तयार

काढा बनविण्यासाठी दीर्घकाळ लागतो. गुरमीतच्या प्लांटमध्ये शेकडो टाक्या आहेत. उसाचा रस वेगवेगळ्या टाकीत वर्षभरासाठी बंद केला जातो. यानंतर टाकींमधून काढा काढल्या जातो. गुरमीत सिंह यांचे संपूर्ण कुटुंब या कामात त्यांची मदत करते. याशिवाय त्यांनी तीन इतर लोकांनाही रोजगार दिला आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

आता वीज स्मार्ट किंवा प्रीपेड मीटर बसवणे गरजेचे

Team webnewswala

चिनी स्मार्टफोनला भारतीय Lava ची टक्कर

Team webnewswala

Apple युझर्सना मोठा झटका मोजावे लागणार अधिक पैसे

Team webnewswala

Leave a Reply