Team WebNewsWala
Other ऑटो राष्ट्रीय व्यापार

जगप्रसिद्ध हर्ले डेव्हिडसन भारतातून गाशा गुंडाळणार

हर्ले डेव्हिडसनने देशातील उत्पादन प्रकल्प बंद करत असल्याची माहिती दिली कंपनीशी संलग्न असलेल्या किमान ७० कर्मचाऱ्यांना रोजगार गमवावा लागणार

हर्ले डेव्हिडसनने आपण देशातील उत्पादन प्रकल्प तसेच विक्री केंद्रे बंद करत असल्याची माहिती गुरुवारी दिली होती. कंपनीने भारतातून गाशा गुंडाळल्यानंतर हर्ले डेव्हिडसन कंपनीशी संलग्न असलेल्या किमान ७० कर्मचाऱ्यांना रोजगार गमवावा लागणार आहे

नवी दिल्ली : दुचाकींसाठी जगप्रसिद्ध असलेली हर्ले डेव्हिडसन ही कंपनी भारतातून आपला गाशा गुंडाळणार आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन्स (फाडा) या महासंघाने शुक्रवारी दिली. यामुळे देशभरात कंपनीच्या सध्या सुरू असलेल्या ३५ डीलरशीपमध्ये काम करणाऱ्या सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांना रोजगारास मुकावे लागणार आहे.

हर्ले डेव्हिडसनच्या वितरकांना १३० कोटी रुपयांचा फटका

हर्ले डेव्हिडसन

 हर्ले डेव्हिडसनने आपण देशातील उत्पादन प्रकल्प तसेच विक्री केंद्रे बंद करत असल्याची माहिती गुरुवारी दिली होती. कंपनीने भारतातून गाशा गुंडाळल्यानंतर कंपनीशी संलग्न असलेल्या किमान ७० कर्मचाऱ्यांना रोजगार गमवावा लागणार आहे. या नोकऱ्या जाण्याबरोबरच या अमेरिकन बाइक उत्पादक कंपनीच्या जाण्यासह हर्ले डेव्हिडसनच्या वितरकांना १३० कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. या सर्व वितरकांनी हर्ले डेव्हिडसनच्या महागड्या बाईक विकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक केली आहे, याकडे फाडाने लक्ष वेधले आहे.

ग्राहकांपुढे या बाइकचे सुटे भाग मिळण्याचा प्रश्न
फाडाचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितले की, आपण भारतातील उत्पादन प्रकल्प बंद करत आहोत याविषयी हर्ले डेव्हिडसनने आपल्या वितरकांना कोणतीही कल्पना दिलेली नाही. या सर्व वितरकांना अद्याप कंपनीकडून तसे अधिकृतरीत्या कळायचे बाकी आहे. वितरकांबरोबरच हर्ले डेव्हिडसनच्या बाइक खरेदी केलेल्या ग्राहकांपुढे या बाइकचे सुटे भाग मिळण्याचा मोठाच प्रश्न निर्माण होणार आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

स्वातंत्र्य दिन व वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त ऑनलाइन कवी संमेलन

Team webnewswala

कशेळी ब्रिज जवळ कंटेनर थेट पुलावरून कोसळला खाडीमध्ये

Team webnewswala

शिवसेनेच्यावतीने कोरोना प्रतिबंध साहित्याचे वाटप

Team webnewswala

Leave a Reply