Team WebNewsWala
Other थोडक्यात शहर समाजकारण

अतिवृष्टीमुळे मुळे कोसळली विजयदुर्ग किल्ल्याची भिंत

The wall of Vijaydurg fort collapsed due to heavy rains

सिंधुदुर्ग – विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे. अतिवृष्टीमुळे आज पहाटे विजयदुर्ग ची भिंत कोलसली आहे…याची माहिती किल्यावर वरील कर्मचारी रामदास, आणि साशंक शिरवाडकर यांनी पुरातत्व खात्याच्या अधिकारी यांना दिली..

ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावरील तिहेरी तटबंदीपैकी दुसरी चिलखती तटबंदी कोसळली. साधारणपणे ३० ते ४० फूट भागातील ही तटबंदी कोसळली. समुद्राकडील पूर्वेच्या बाजूने असलेली दुसरी चिलखती तटबंदी सतत पडणाऱ्या पावसामुळे जमीन ओली होऊन मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. सकाळी किल्ल्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या निदर्शनास सदर बाब आली.

त्यांनी तातडीने पुरातत्व विभागास सदर गोष्टीची कल्पना दिली. पुरातत्व विभागाकडून पुढील उपाययोजना करण्यात येतील.

संबंधित प्रशासनाने वेळीच या गोष्टीचे गांभीर्य ओळखून योग्य पावले उचलली नाहीत तर किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात येईल.
समीर शिरवाडकर
गडकिल्ले अध्यक्ष -छावा संघटना -महाराष्ट्र

विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. ४० किलोमीटर लांब असलेली वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे. कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठी आरमारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात, पण ती समुद्रावरून दिसत नसत.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

भिवंडी लसीकरण केंद्राला खासदार कपिल पाटील यांची भेट

Web News Wala

लोक जनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांचे निधन

Team webnewswala

काय सांगतात मैलाचे दगड जाणुन घ्या

Web News Wala

Leave a Reply