Team WebNewsWala
शहर समाजकारण

गावकऱ्यांनी श्रमदानातून बुजविले नाटे ते जैतापूर पूल पर्यंतच्या रस्त्यावरचे खड्डे

गावकऱ्यांनी श्रमदानातून बुजविले नाटे ते जैतापूर पूल पर्यंतच्या रस्त्यावरचे खड्डे. रत्नागिरी - नाटे-धौलवल्ली - जैतापूर चा प्रवास खड्डेमय

गावकऱ्यांनी श्रमदानातून बुजविले नाटे ते जैतापूर पूल पर्यंतच्या रस्त्यावरचे खड्डे

रत्नागिरी – नाटे-धौलवल्ली – जैतापूर चा प्रवास गेल्या काही महिन्यांपासून खड्डेमय होत होता. रत्नागिरी ते देवगड अगदी शॉर्टकट असलेला सागरी महामार्ग रस्ता नाटे पोलीस स्टेशन ते कुवेशी पर्यत खड्डेमय आहे. प्रवासात अनेक दुचाकीस्वार या खराब रस्त्यामुळे पडले, गाड्या बंद पडल्या अश्या प्रकारचा तक्रारी अनेक चालकाकडून येत आहेत. काही दिवसांपूर्वी आपल्या विभागांतील जागृत नागरिकांनी आपल्या लेखणीतून निद्रिस्त शासनाला जाग करण्याचा तसा प्रयत्न ही केला होता, पण रोडवलेल्या प्रशासकीय यंत्रणेवर याचा काहीही फरक पडला नाही, त्याच प्रमाणे काही वृत्तपत्रात सुद्धा या खड्डेमय प्रकारचा लेखा-जोखा पत्रकारांनी मांडला.

सदर, रस्त्याबाबत सा. बा. विभाग राजापूर यांची, तर नाटे पोलिस स्टेशन च्या परवानगी ने त्यातील काही भाग श्रमदानातून माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ राजापूर च्या कार्यकर्त्यांनी मिळून तबरेज चौक ( नाटे) ते जैतापूर पूल पर्यत खड्डे बुजविण्याचे काम केले.

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ कार्यकर्त्यांनी केले खड्डे बुजविण्याचे काम

यासाठी टेम्पो, माती आणि पाणी हे विलास कोठरकर यांच्याकडून घेउन या कामासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे राज्य सचिव श्री. समीर विजय शिरवडकर, राजापूर तालुका अध्यक्ष श्री. पिंट्या कोठरकर, राजापूर तालुका सचिव श्री.प्रशांत पवार, विभाग अध्यक्ष श्री.रुपेंद्र कोठरकर, सदस्य- श्री. प्रसाद कामत, ओंकार ठाकूर, सिद्धेश कोठरकर, पप्या राणे, विलास कोठरकर, अजय, विजय उखांडे आदींनी मेहनत घेतली..

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

नव्या वर्षात नवी मुंबईकरांना मेट्रो प्रवासाची भेट

Web News Wala

भिवंडी पालिकेचा अजब कारभार कोट्यवधींच्या घंटागाड्या धुळीत

Web News Wala

अ‍ॅलोपॅथी वादात अक्षय कुमारची एन्ट्री

Web News Wala

Leave a Reply