Team WebNewsWala
राजकारण शहर समाजकारण

‘कोरोनामुक्त गाव स्पर्धा’ गावाला मिळणार 50 लाख

महाराष्ट्र राज्य कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून 'कोरोनामुक्त गाव स्पर्धा' आयोजन करण्यात येणार आहे.

‘कोरोनामुक्त गाव स्पर्धा’ गावाला मिळणार 50 लाख

Webnewswala Online Team – राज्याच्या ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे आणि लवकरात लवकर सर्व गावे कोरोनामुक्त झाली पाहिजे. गाव कोरोनामुक्त झाले तर त्याद्वारे लवकरात लवकर तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून ‘कोरोनामुक्त गाव स्पर्धा’ आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या स्पर्धेची घोषणा केली.

गावाच्या वेशीवरच कोरोनाला रोखलेल्या गावांचा गौरव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

कोरोनामुक्त गावांना मिळणार इनाम

या स्पर्धेत राज्यातील सर्व गावांनी सहभागी होऊन आपले गाव लवकरात लवकर कोरोनामुक्त करावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

Web Title – ‘कोरोनामुक्त गाव स्पर्धा’ गावाला मिळणार 50 लाख ( The village will get Rs 50 lakh for ‘Coronamukta Gaon Spardha’ )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

मुंबईत आज बरे होणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा 9 पटीने अधिक

Web News Wala

लवकरच येणार स्वदेशी लस सरकारने दिले 1500 कोटी

Web News Wala

वीजबिल वसुली साठी महावितरण ची अनोखी शक्कल

Web News Wala

Leave a Reply