Team WebNewsWala
अर्थकारण आंतरराष्ट्रीय

अमेरिका भारतातील FDI चा दुसर्‍या क्रमांकाचा स्रोत

अमेरिका भारतातील FDI चा दुसरा मोठा स्त्रोत बनला आहे आणि मॉरिशसला तिसर्‍या स्थानावर टाकले आहे. यामध्ये सिंगापूर पहिल्या स्थानावर

अमेरिका भारतातील FDI चा दुसर्‍या क्रमांकाचा स्रोत

Webnewswala Online Team – अमेरिका भारतातील FDI (Foreign Direct Investment) चा दुसरा मोठा स्त्रोत बनला आहे आणि मॉरिशसला तिसर्‍या स्थानावर टाकले आहे. यामध्ये सिंगापूर पहिल्या स्थानावर आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या Department for Promotion of Industry and Internal Trade ने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सन 2020-21 मध्ये अमेरिकेतून भारतात 13.82 अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. या काळात सिंगापूरमधील एफडीआय 17.41 अब्ज डॉलर्स इतकी होती.

मॉरिशसकडून 5.64 अब्ज डॉलर्सची FDI

सन 2020-21 मध्ये मॉरिशसकडून 5.64 अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक (FDI) प्राप्त झाली. त्याखालोखाल संयुक्त अरब अमिरातीचे 4.2 अब्ज डॉलर्स, केमेन आयलँड्स 2.79 अब्ज डॉलर्स, नेदरलँडचे 2.78 अब्ज डॉलर्स, ब्रिटनचे 2.04 डॉलर्स डॉलर, जपानचे 1.95 अब्ज डॉलर्स, जर्मनीचे 66.7 कोटी डॉलर्स आणि सायप्रस 38.6 कोटी डॉलर्स आहेत.

भारतातील FDI 19 टक्क्यांनी वाढून 59.64 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे

सरकारी आकडेवारीनुसार सन 2020-21मध्ये भारतातील FDI 19 टक्क्यांनी वाढून 59.64 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारने अनेक धोरणात्मक सुधारणा, गुंतवणूक सुविधा आणि व्यवसाय सुलभ करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.

आधीच्या FDI गुंतवणूकदारांनी भांडवल आणि नफ्याच्या पुनर्गुंतवणुकीत यामध्ये भर घातली तर सन 2020-21 मध्ये एकूण FDI 81.72 अब्ज डॉलर्स इतकी होती, जी सन 2019-20 मध्ये 74.39 अब्ज डॉलर्सपेक्षा दहा टक्के जास्त आहे. गेल्या आर्थिक वर्षात कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रांमध्ये 26.14 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीसह थेट परकीय गुंतवणूक आकर्षित केली गेली. त्यापाठोपाठ इंफ्रास्ट्रक्चर (7.87 अब्ज डॉलर्स) आणि सर्व्हिस सेक्टर (5 अब्ज डॉलर्स) आहेत.

Web Title – अमेरिका भारतातील FDI चा दुसर्‍या क्रमांकाचा स्रोत ( The US is the second largest source of FDI in India )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

Loan Moratorium सुप्रीम कोर्टाने दिला मोठा दिलासा

Team webnewswala

सोलापूरचे शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार

Team webnewswala

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुखही Home Quarantine

Team webnewswala

Leave a Reply