राजकारण राष्ट्रीय समाजकारण

सुप्रीम कोर्टानं सरकारकडे मागितला कोरोना लसींचा हिशोब

कोरोना लसीकरणाच्याबातीत सुप्रीम कोर्टानं आज केंद्र सरकारला कोरोना लसींचा हिशोब देण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारनं आजवर खरेदी केलेल्या कोरोना विरोधी लसींची सर्व माहिती कोर्टासमोर सादर करण्याच्या सूचना

सुप्रीम कोर्टानं सरकारकडे मागितला कोरोना लसींचा हिशोब

Webnewswala Online Team – कोरोना लसीकरणाच्याबातीत सुप्रीम कोर्टानं आज केंद्र सरकारला कोरोना लसींचा हिशोब देण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारनं आजवर खरेदी केलेल्या कोरोना विरोधी लसींची सर्व माहिती कोर्टासमोर सादर करण्याच्या सूचना कोर्टानं दिल्या आहेत. यासाठी केंद्राला दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.

सर्व माहिती बंद लिफाफ्यात सादर करण्यास सांगितलं

कोरोना लसींची खरेदी सरकारनं केव्हा, कधी आणि किती प्रमाणात केली याची लेखी माहिती कोर्टानं मागितली आहे. त्यासोबतच देशात आतापर्यंत एकूण किती नागरिकांचं लसीकरण झालेलं आहे याचीही माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोर्टानं ही सर्व माहिती बंद लिफाफ्यात सादर करण्यास सांगितलं आहे.

देशात आतापर्यंत किती जणांना कोरोना विरोधी लस देण्यात आली आहे आणि उर्वरित जनतेचं लसीकरण कधीपर्यंत पूर्ण होईल ? असा सवाल सुप्रीम कोर्टानं सरकारला विचारला आहे. याशिवाय देशात म्यूकर मायकोसिसच्या वाढच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक औषधांच्या उपलब्धतेसाठी सरकारनं नेमकी कोणती तयारी केली आहे? याचीही माहिती देण्यासही कोर्टानं सांगितलं आहे.

कधी, केव्हा आणि किती खरेदी ? 

न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायाधीश एल. एन. राव आणि एस. रवींद्र भट्ट यांच्या विशेष खंडपीठानं आज दिलेल्या आदेशात म्हटलं की केंद्र सरकारनं आजवर खरेदी केलेल्या कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सीन आणि स्पुतनिक V  लशींच्या खरेदीसाठी नेमक्या केव्हा ऑर्डर देण्यात आल्या ? एकूण किती लस खरेदी करण्यात आल्या आणि त्यांचं वाटप कशापद्धतीनं करण्यात आलं ? याची स्पष्ट माहिती कोर्टासमोर सादर करावी. याशिवाय, आतापर्यंत देशातील एकूण जनतेपैकी किती टक्के जनतेला लसीचा पहिला किंवा दुसरा डोस देण्यात आला आहे याचीही माहिती सादर करावी. यात ग्रामीण आणि शहरी भागातील प्रमाण किती ? याचीही माहिती सरकारनं द्यावी असं कोर्टानं नमूद केलं आहे.

Web Title – सुप्रीम कोर्टानं सरकारकडे मागितला कोरोना लसींचा हिशोब ( The Supreme Court has asked the government to account for the corona vaccine )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

सोशल मीडिया वापरासाठी, केंद्र सरकारची नियमावली जाहीर

Web News Wala

Atum 1.0 : स्वस्त इलेक्ट्रिक बाइकच्या डिलिव्हरीला सुरूवात

Web News Wala

पहिल्याच दिवशी Income Tax ची Website Crash

Web News Wala

Leave a Reply