राष्ट्रीय

Statue Of Unity ला रेल्वे नेटवर्कद्वारे जोडणार

जगातील सर्वाधिक उंचीच्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यामुळे चर्चेत आलेले गुजराथचे केवडिया शहर पूर्णपणे ई वाहन शहर बनविले जात असून अशी व्यवस्था असलेले पहिलेच शहर

गुजरात – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(रविवार) गुजरातमधील केवडिया येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘Statue Of Unity’ शी जोडल्या जाणाऱ्या आठ रेल्वेंना सकाळी ११ वाजता हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या रेल्वे केवडियाला (Statue Of Unity) वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई आणि प्रतापनगर या शहरांना जोडणार आहेत.

केवडिया रेल्वेस्थानक अद्यावत सुविधांनी परिपूर्ण असून, हे देशातील पहिले ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकीट प्राप्त रेल्वेस्थानक आहे.रेल्वे नेटवर्कच्या माध्यमातून देशातील विविध शहारांमधून गुजरातमधील ‘Statue Of Unity’ ला पाहण्यासाठी पर्यटकांना सहजरित्या येता येणार आहे.

रेल्वे योजनेच्या या उद्घाटनाप्रसंगी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे. या योजनेमुळे भारतीय रेल्वेच्या नकाशावर जगातील सर्वात भव्य अशा स्टॅच्यू ऑफ यूनिटीला देखील स्थान मिळणार आहे. तसेच, यामुळे गुजरातमधील पर्यटनास देखील मोठी चालना मिळणार आहे. या अगोदर स्टॅच्यू ऑफ यूनिटी पाहण्यास जाण्यासाठी पर्यटकांना वडोदरा, भरूच आणि अंकलेश्वर रेल्वेस्थानकावर पोहचावे लागत होते.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा जगातील सर्वात उंच पुतळा

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.यापूर्वी अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ हा ९३ मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा होता. अवघ्या पाच वर्षात या स्मारकाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. ३१ ऑक्टोंबर २०१३ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनीच या स्मारकाचे भूमिपूजन केले होते.नर्मदा नदीतील सरदार सरोवर धरणात हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.comआमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

गंगेत सापडला Suckermouth catfish तज्ज्ञांकडून चिंता

Team webnewswala

राज्यसभेमध्ये बँक नियमन विधेयक मंजूर

Team webnewswala

सूर्याचा ‘रोहिणी’ प्रवेश तापमान वाढण्याची चिन्हे

Web News Wala

Leave a Reply