Team WebNewsWala
आरोग्य राष्ट्रीय

राज्याचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर 3 महिन्यात प्रथमच कमी रुग्ण

Corona Virus 10 किलो विषाणूंच्या विळख्यात अख्खे जग. संसर्ग झालेल्या एका व्यक्तीत साधारणत: दहा हजार कोटी विषाणू असतात.

राज्याचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर 3 महिन्यात प्रथमच कमी रुग्ण

Webnewswala Online Team – राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) गेल्या तीन महिन्यात शनिवारी प्रथमच 95 टक्क्यांवर गेले आहे. आज दिवसभरात कोरोनाचे 21 हजार 776 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण 55 लाख 28 हजार 834 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, तीन महिन्यात शनिवारी प्रथमच सर्वात कमी 13 हजार 659 कोरोना रुग्णांचे निदान झाले. 10 मार्च 2021 रोजी आजच्या इतकेच रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सातत्याने दैनंदिन रुग्ण संख्या वाढत होती. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्यादेखील 1 लाख 88 हजार 027 इतकी झाली आहे.

राज्यात आज 300 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.71 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 62 लाख 71 हजार 483 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58 लाख 19 हजार 224 (16.04 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 14,00,052 व्यक्ती होमक्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 7,093 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

Web Title – राज्याचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर 3 महिन्यात प्रथमच कमी रुग्ण ( The state’s recovery rate at 95 percent  )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

नौदलाची वाढणार ताकद बांधण्यात येणार 6 स्वदेशी पाणबुड्या

Web News Wala

रजनीकांत आज मोठी घोषणा करण्याची शक्यता

Team webnewswala

ऑस्ट्रेलिया उंदरांमुळे त्रस्त; भारताकडे 5 हजार लिटर विषाची मागणी

Web News Wala

Leave a Reply