Team WebNewsWala
शहर शिक्षण

बारावी परीक्षा रद्द करण्याकडे राज्याचा कल

शिक्षण विभागाने बारावी परीक्षेसाठीही पर्याय शोधायला हवा, अशी भूमिका केंद्रीय स्तरावरील बैठकीत. त्यामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्याकडे राज्याचा कल

बारावी परीक्षा रद्द करण्याकडे राज्याचा कल

Webnewswala Online Team – दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर मूल्यमापन कसे करावे, याबाबत अद्यापही निर्णय घेऊ न शकलेल्या राज्याच्या शिक्षण विभागाने बारावी परीक्षेसाठीही पर्याय शोधायला हवा, अशी भूमिका केंद्रीय स्तरावरील रविवारच्या बैठकीत घेतली. त्यामुळे दहावीपाठोपाठ बारावीची परीक्षा रद्द करण्याकडे राज्याचा कल असल्याचे दिसते.

केंद्रस्तरीय बैठकीत पर्याय शोधण्याची भूमिका

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह इतर केंद्रीय, आंतरराष्ट्रीय मंडळे, राज्यमंडळ यांनी दहावीची परीक्षा रद्द केली. त्यानंतर बारावीची परीक्षाही रद्द करण्याची मागणी पालकांनी केली. त्या अनुषंगाने केंद्रीय स्तरावर रविवारी बैठक घेण्यात आली. त्यात राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी भूमिका मांडली. ‘विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यायला हवे. बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापनाचे सूत्र केंद्रीय पातळीवर समान असावे, बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन मंडळाच्या परीक्षेव्यतिरिक्त इतर मार्गानी करणे शक्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे,’ असे गायकवाड म्हणाल्या.

‘विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि मानसिकता याचा विचार करणे आवश्यक आहे. बारावीनंतरच्या अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून होतात. बारावीच्या परीक्षाबाबत सध्या असलेली अनिश्चितता लवकर दूर करून विद्यार्थी हिताचा निर्णय घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचे समान सूत्र असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांना प्राधान्याने लस देणेही गरजेचे आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि तज्ज्ञांशी चर्चा करून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल,’ असे गायकवाड यांनी बैठकीत सांगितले.

Title – बारावी परीक्षा रद्द करण्याकडे राज्याचा कल ( The state tends to cancel the 12th standard examination )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

Amazon Flipkart च्या मराठी अँप साठी मनसे आक्रमक

Team webnewswala

नाटय़गृहांचे भाडे कमी करा अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद

Team webnewswala

नागपुर मुंबई बुलेट ट्रेन साठी हवाई सर्वेक्षण सुरू

Web News Wala

Leave a Reply